II Phase SIR: संपूर्ण देशात होणार SIR पण 'या' राज्याला वगळलं! CEC ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं कारण
Sarkarnama October 28, 2025 03:45 AM

II Phase SIR: भारतीय निवडणूक आयोगानं आज देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून स्पेशल इटेन्सिव्ह रिव्ह्यू (SIR) अर्थात विशेष मतदारयाद्या पडताळणी मोहीम जाहीर केली. यानंतरच्या टप्प्यात उर्वरित राज्यांसाठी ही मोहीम राबवली जाणार आहे. पण यामधून एका राज्याला वगळण्यात आलं आहे. या राज्याचे नियम वेगळे असल्यानं त्याला या प्रक्रियेतून सध्या वगळण्यात आलं आहे. याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Uddhav Thackeray: अॅनाकोंडाचा मुंबई गिळण्याचा प्लॅन! उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांवर पुन्हा निशाणा आसामला का वगळलं?

ज्ञानेश कुमार यांनी ९ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांसाठी SIR मोहिमेची घोषणा केली. यावेळी पत्रकारांनी त्यांना आसाम या राज्याला यातून का वगळलं असा प्रश्न विचारला. यावर स्पष्टीकरण देताना ज्ञानेश कुमार म्हणाले, "जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की भारतीय नागरिकत्व कायद्यात आसामसाठी वेगळ्या तरतुदी आहेत. तसंच दुसरा विषय असा आहे की सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली आसाममध्ये नागरिकत्व पडताळणीचा कार्यक्रम लवकरच पूर्ण होणार आहे. अशा स्थितीत हे जे २४ जून २०२५ रोजीचा SIR चा जो आदेश होता, तो संपूर्ण देशासाठी होता. पण हा आदेश आसामसाठी लागू होत नाही. त्यामुळं आसामसाठी वेगळे SIR चे आदेश लागू केले जातील"

II Phase SIR: आता दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यांत होणार SIR! महाराष्ट्रात मतदार याद्यांची पुनर्पडताळणी होणार का? ECIनं केलं जाहीर महाराष्ट्रात का नाही?

दरम्यान, महाराष्ट्रातही या दुसऱ्या टप्प्यात SIR मोहीम जाहीर होईल असं वाटत होतं. पण महाराष्ट्राला दुसऱ्या टप्प्यातून वगळण्यात आलं आहे. त्याचं कारण आयोगानं स्पष्ट केलेलं नसलं तरी, महाराष्ट्रासह उर्वरित १९ राज्यांचे आणि ५ केंद्र शासित राज्यांमध्ये पुढील टप्प्यात SIR प्रक्रिया पार पडणार आहे. पण महाराष्ट्राचं नाव यातून वगळण्यामागे काही कारण दिसून येतात ती म्हणजे सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. जानेवारी २०२६ पर्यंत जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा, नगरपालिका तसंच महानगरपालिका निवडणूका घ्याव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.

BJP Office: भाजपच्या नुतन प्रदेश मुख्यालयाच्या जागेवरुन वाद! BMCचा निवासी भूखंड 11 दिवसांत हस्तांतरीत; नेमकं प्रकरण काय? पुढच्या टप्प्यात महाराष्ट्रात

त्यामुळं महाराष्ट्रात हा मोठ्या प्रमाणावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पार पडणार असल्यानं इथं SIR प्रक्रिया राबवणं शक्य नाही. तसंच दुसऱ्या टप्प्याचा SIR चा कार्यक्रम हा उद्यापासूनच सुरु होत आहे. त्यामुळं महाराष्ट्राला या टप्प्यातून वगळण्यात आलं असावं. तसंच यानंतर थेट चार ते पाच वर्षांनीच सार्वत्रिक निवडणुका पार पडणार असल्यानं मधल्या काळात तिसऱ्या टप्प्यात निवडणूक आयोगानं SIR राबवलं तर त्यात महाराष्ट्रात ही प्रक्रिया राबवली जाऊ शकते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.