-rat२६p७.jpg-
P२५O००५४६
शान बिरवाडकर
---
बुद्धिबळ स्पर्धेसाठी
बिरवाडकरची निवड
लांजा ः येथील डी. जे. सामंत इंग्लिश स्कूलमधील शान बिरवाडकरने शालेय बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. त्याची कऱ्हाड येथे होणाऱ्या विभागीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. डी. जे. सामंत इंग्लिश मीडियमचे अध्यक्ष आर. डी. सामंत, दीपक कामत, समिक्षा कामत, संजय तेंडुलकर, जितेश गावकर, मुख्याध्यापक श्री. उपाध्ये, क्रीडाशिक्षिका तेजस्विनी आचरेकर यांनी त्याचे अभिनंदन केले.
संपर्क फाउंडेशनच्या
कार्यालयाचे उद्घाटन
रत्नागिरी ः संपर्क युनिक फाउंडेशनच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांच्या हस्ते करण्यात आले. रत्नागिरी येथील जावकर प्लाझा येथे हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्ण मदत केंद्राद्वारे गरजूंना मदत केली जाते. गरजू नागरिकांनी संपर्क युनिक फाउंडेशनशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष शकील गवाणकर यांनी केले आहे.
सती विद्यालयात
विद्यार्थी स्नेहमेळावा
चिपळूण ः खेर्डी चिंचघरी (ता. चिपळूण) येथील प्राथमिक विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आणि दिवाळी फराळ कार्यक्रम उत्साहात झाला. या वेळी मुख्याध्यापक अरविंद सकपाळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शालेय आठवणींना उजाळा देण्यासाठी परिपाठ घेण्यात आला. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अशोक निर्मळ, ग्रंथपाल जे. व्ही. पवार, शिक्षक आणि माजी विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. माजी विद्यार्थी शाळेशी जोडले जावेत या हेतूने माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला आहे. या संघाचे अध्यक्ष रोशन भुरण, उपाध्यक्ष सौरव केंगार, कोषाध्यक्ष उत्कर्षा पोतदार, सदस्य शिवम जंगम आणि प्रमुख मार्गदर्शक अशोक निर्मळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
काळे विद्यालयात
अमृत दुर्गोत्सव
चिपळूण ः येथील आर. सी. काळे माध्यमिक विद्यालयात दीपोत्सवाच्या निमित्ताने विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांना अमृत दुर्गोत्सवमध्ये उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन मुख्याध्यापक श्री. माळी यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांना विश्वविक्रमी मानवंदना देणाऱ्या या लोकोत्सवात विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
आमदार जाधवांचा
कार्यकर्त्यांशी संवाद
चिपळूण : वीर गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांची भेट घेतली. गुहागर विधानसभा मतदार संघाचा विकास तुम्ही करू शकता असे सांगत गावच्या विकासासाठी निधीची मागणी केली. शहरातील आमदार जाधव यांच्या संपर्क कार्यालयात वीर गावातील कार्यकर्त्यांनी आमदार जाधव यांची भेट घेतली. या वेळी शंकर घेवडे, धोंडू घेवडे, पांडुरंग घेवडे, यशवंत घेवडे, चंद्रकांत शिगवण, बारकू शिगवण, मंगेश विरकर, भागोजी दुर्गोळी आदी उपस्थित होते. आमदार भास्कर जाधव यांच्यासह जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी या सर्वांचे स्वागत केले. तुमच्या भागाच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन आमदार जाधव यांनी कार्यकर्त्यांना दिले.