पालकमंत्री राणेंच्या हस्ते रेडीत बंधाऱ्याचे काम सुरू
esakal October 28, 2025 11:45 AM

पालकमंत्री राणेंच्या हस्ते
रेडीत बंधाऱ्याचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २७ ः रेडी यशवंतगड (ता. वेंगुर्ले) नजीक धूप प्रतिबंधक बंधारा बांधकामाचे शनिवारी (ता. २५) पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कोकण आपत्कालीन निधी अंतर्गत या रेडी यशवंतगड धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी ४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
पर्यटनवृद्धीसाठी महत्त्वाचा असलेला रेडी यशवंतगड समुद्रकिनारा ते शिरोडा वेळागारपर्यंत झुलत्या पुलाचे काम मंजूर करण्याबाबत माजी आरोग्य-शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सरपंच रामसिंग राणे, भाजप तालुकाध्यक्ष पपू परब, रेडी उपसरपंच लक्ष्मीकांत भिसे, पंचायत समिती माजी सभापती अजित सावंत, माजी उपसरपंच नमिता नागोळकर, शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे, ग्रामपंचायत सदस्य मानसी राणे, गणेश भगत, पिंट्या राणे, रिचा सावंत, अश्विनी सातोसकर, नितीन सावंत, जगदीश गवंडी, देवेंद्र रेडकर, चक्रपाणी गवंडी, वैभव आसोलकर, शांताराम कांबळी, बाबाजी राणे, रोहित गवंडी, अण्णा गडेकर, भूषण सारंग, सागर राणे, आबा राणे, संजू कांबळी, अमित सावंत, महेश सावंत, नंदू मांजरेकर, श्रद्धा धुरी, अरुण राणे, महेश कोनाडकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.