Phaltan Doctor Case: PSI बदनेसोबत ६ महिने संपर्क, आत्महत्येपूर्वी बनकरला फोटो अन् मेसेज पाठवले; रुपाली चाकणकरांचा धक्कादायक खुलासा
Saam TV October 28, 2025 11:45 AM

साताऱ्याच्या फलटणमधील शासकीय रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फलटणमध्ये जाऊन जिल्हा रुग्णालयाला भेट दिली आणि पत्रकार परिषद घेत या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे केले. यावेळी रुपाली चाकणकर यांनी आरोपी आणि आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर यांच्यातील संपर्काविषयी सांगितले.

'जानेवारी ते मार्चदरम्यान डॉक्टर आणि पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने हे संपर्कात होते आणि त्यांचे अनेकदा बोलणं झालं होतं. त्यानंतर डॉक्टर आरोपी प्रशांत बनकरच्या संपर्कात होती, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली. तसंच, पोलिसांनी सीडीआर काढला आहे. त्यामुळे सुसाईड नोटमध्ये गोपाल बदने, प्रशांत बनकर यांची नावं होती. जानेवारी ते मार्चदरम्यान गोपाल बदनेसोबत डॉक्टर संपर्कात होती. त्यानंतर डॉक्टर आणि बदनेचा काही संवाद झाला नाही. त्यानंतर प्रशांत बनकरसोबत डॉक्टराचा संवाद झाल्याचा रेकॉर्ड आहे.'

Doctor Death Case Satara: ही आत्महत्या नाही… व्यवस्थेने केलेला खून! फलटणच्या डॉक्टर मृत्यूचं गूढ वाढतंय

रुपाली चाकणकर यांनी पुढे सांगितले की, 'डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की चार वेळा बलात्कार केला. त्यानुसार गोपाल बदने आणि डॉक्टर या दोघांचे लोकेशन कुठे एकत्र होतं का? हे सीडीआरच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. सीडीआर आणि फॉरेन्सिकच्या अहवालातून लोकेशन शोधलं जाणार आहे. पोलिसांकडून गोपाल बदनेचा जबाब नोंदवला जात आहे. पोलिसांकडून डॉक्टर, बदने आणि बनकर या तिघांचाही सीडीआर काढला जात आहे. तर इतरांचा सीडीआर गरजेचा पडला तर तो काढला जाईल.'

Doctor Death Case Satara: ही आत्महत्या नाही… व्यवस्थेने केलेला खून! फलटणच्या डॉक्टर मृत्यूचं गूढ वाढतंय

दरम्यान, 'या प्रकरणाचे सर्व अपडेट महिला आयोगाकडून रोज घेतले जात आहेत. आम्ही याबाबत आवश्यक सूचना देत आहोत. सीडीआर, फॉरेन्सिक अहवाल अशीच कारवाई केली जाईल. या प्रकरणाचा तपास एसपी, डीव्हायएसपी, सायबर सर्व एकत्रितपणे करत आहेत. ', असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी डॉक्टरच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Satara Doctor Death : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राजकीय व्यक्तीचे नाव |VIDEO
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.