Satara Doctor Case: ती बीडची होती म्हणून तिचा जीव घेतला गेला, डॉक्टर आत्महत्या प्रकरणाबाबत ठाकरेंच्या महिला नेत्याचा गंभीर आरोप
Saam TV October 28, 2025 11:45 AM

साताऱ्याच्या फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी माजी खासदारावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी डॉक्टरच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमधील हस्ताक्षर तिचे नव्हतेच असा दावा त्यांनी केली. आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाल बदने हजर झाले यामध्ये सर्व गोष्टी संशयास्पद वाटतात, असं देखील मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी सुषमा अंधारे यांनी माजी खासदाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोन बहिणींना देखील पत्रकार परिषदेत समोर आणंल. त्यांनी पत्रकारांना त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं हे सांगितले.

सुषमा अंधारे यांनी साताऱ्याच्या माजी खासदारावर गंभीर आरोप केला. त्यांनी सांगितले की, 'फिजिकली फिट आणि अनफिट ठरवणे हे तिथल्या वैद्यकीय अधिकारी यांच्या हातात होतं. माजी खासदार त्यांच्यावरती दबाव आणत होते. फलटणमधील पोलिस स्टेशन कोण हाताळत आहेत? पोलिसांना हाताशी धरून त्यांनी २७७ पोलिस कम्पलेट केल्या आहेत. बीडच्या लोकांना काय त्रास होतो बीडच्या लोकांना काय त्रास दिला जातोय. ती बीडची आहे म्हणून तिचा जीव घेतला गेला. माजी खासदार देवेंद्र फडणवीस यांच्या जीवावरती उड्या मारत आहेत.'

Satara Doctor Case : साताऱ्यात भाड्याच्या घरात राहणारी डॉक्टर महिला लॉजवर राहायला का गेली? धक्कादायक माहिती समोर

'फलटणमध्येनक्कीच काय चाललंय. बीडचे ऊसतोड कामगार तिथं हालाखीचे आणि गुलामीचे जीवन जगत आहेत. माजी खासदाराकडून फिजिकली फिट असण्यासाठी दबाव आणला. वैष्णवी हगवणेचं चारित्र्य जसं हनन करण्यात आले त्याच पद्धतीने डॉक्टरचे सुद्धा चारित्र्य हनन केले जात आहे. डॉक्टरने आत्महत्या केली का तिची हत्या करण्यात आली.', असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. तसंच, डॉक्टरच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोटमध्ये तिचं हस्ताक्षर नाही. प्रशांत बनकर आणि गोपाल बदने हजर झाले यामध्ये सर्व गोष्टी संशयास्पद वाटतात.', असं त्या म्हणाल्या.

Satara Doctor Case : मोगलाई व्यवस्थेनं घेतला डॉक्टरचा बळी? प्रशांत बनकरला बेड्या, गोपाळ बदने कधी होणार गजाआड? VIDEO

सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्हिडीओ दाखवले. या व्हिडिओतील लोकांनी आत्महत्येपूर्वी माजी खासदार यांच्यावर आरोप केले आहेत असं अंधारे यांनी सांगितले. सुषमा अंधारे यांनी दावा केला की तो व्हिडिओ सर्व ठिकाणाहून डिलीट केला आहे. नंदकुमार ननावरे यांनी आणि त्यांच्या बायकोने आत्महत्या केली त्यापूर्वी माजी खासदाराच्या नावाने सुसाईड व्हिडिओ बनवला होता. खासदाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या दोन बहिणींपैकी एकीने सांगितले की, 'महिला डॉक्टरला जसं घाबरवलं तसं माजी खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला घाबरवलं. तर रचना दिंगबर आगवणे ही माजी खासदाराच्या त्रासामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणारी मुलगी आहे. डॉक्टरची परिस्थिती झाली होती तशीच परिस्थिती आमची झाली होती. आम्हाला खूप भीती वाटत होती. आमच्यावरती कोणीतरी हात टाकेल म्हणून आम्ही दोन्ही बहिणींनी आत्महत्याचा निर्णय घेतला होता.'

Doctor Death Case Satara: ही आत्महत्या नाही… व्यवस्थेने केलेला खून! फलटणच्या डॉक्टर मृत्यूचं गूढ वाढतंय

माजी खासदारावर आरोप करत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दुसऱ्या बहिणीने पत्रकार परिषदेत सांगितले की, 'डॉक्टरसोबत जे झालं ते दोन वर्षांपूर्वी आम्ही पण भोगलं आहे. प्रशासनाचा गैरवापर करून आमच्यावरती गुन्हे दाखल केले. आमच्यावरती २५ गुन्हे दाखल केले आहेत. आमच्यावरती दबाव टाकला. आमचे व्हिडिओ डिलिट केले.' यावेळी सुषमा अंधारे यांनी सांगितले की, आमचा दाट संशय आहे की डॉक्टरची हॉटेलवर नेऊन हत्या करण्यात आली. तिचे नातेवाईक आले नसताना तिची डेडबॉडी का उचलली? सुसाईट नोट गायब झाली आहे. बनकर आणि बदने दोन्ही प्रकरण वेगळे आहेत का? त्यांची नावे टाकून दिशाभूल केली जात आहे का?', असे सवाल अंधारे यांनी उपस्थित केलेत. यावेळी सुषमा अंधारे यांनी माजी खासदाराच्या चौकशीची मागणी केली.

Satara Doctor Death : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राजकीय व्यक्तीचे नाव |VIDEO
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.