00621
वैभववाडी येथे पत्रकार कक्षाचे
पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
वैभववाडी, ता. २७ ः येथील पंचायत समिती इमारतीतील पत्रकार कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते केले. पंचायत समितीत सुरू झालेला हा जिल्ह्यातील पहिला पत्रकार कक्ष आहे.
तालुक्यातील कोणत्याही प्रशासकीय इमारतीत पत्रकार कक्ष नव्हता. त्यामुळे वैभववाडी तालुका पत्रकार समितीने येथील पंचायत समिती इमारतीत पत्रकार कक्षासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती. त्याची पालकमंत्री राणे यांनी तातडीने दखल घेतली. याबाबतच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या होत्या. पालकमंत्री राणे यांनी फीत कापून या पत्रकार कक्षाचे उद्घाटन केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, वैभववाडी तालुका पत्रकार समितीचे पदाधिकारी एकनाथ पवार, उज्ज्वल नारकर, महेश रावराणे, नरेंद्र कोलते, श्रीधर साळुंखे, स्वप्नील कदम, प्रा. एस. एन, पाटील तसेच भाजप पदाधिकारी सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, संचालक दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, दिगंबर पाटील, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, संजय सावंत, पंचायत समितीचे अधिकारी विशाल चौगुले, मनोज सावंत, संतोष टक्के आदी उपस्थित होते.