समुद्रकिनारी मंडप आणि दिमाखदार कार्यक्रम ; असा होणार स्वानंदी-समरचा शाही विवाह, जाणून घ्या तारखा आणि वेळ
esakal October 28, 2025 08:45 PM

Marathi Entertainment News : झी मराठीवरील सध्या सगळ्यात जास्त चर्चेत आलेली मालिका म्हणजे वीण दोघांतली ही तुटेना. तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची मुख्य भूमिका या मालिकेत आहे. आता या मालिकेत लवकरच स्वानंदी आणि समरचं लग्न पार पडणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत.

अधिरा आणि रोहनचं लग्न व्हावं म्हणून स्वानंदी आणि समर लग्न करण्याचा निर्णय घेतात. मल्लिका काही ना काही करून त्यांचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करतेय पण तिचे प्रयत्न यशस्वी ठरत नाहीये. त्यातच आता समर आणि स्वानंदीचं लग्न थाटात पार पडणार आहे. मालिकेचा टीझर प्रोमो नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला.

सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतोय तो समुद्रकिनारी उभा केलेला लग्नाचा मंडप, रात्री संगीत कार्यक्रमासाठी उभा केलेला स्टेज, सूर्याच्या साक्षीने स्वानंदी आणि समरने घेतलेली लग्नाची वचन याची झलक पाहायला मिळतेय.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

29 ऑक्टोबरला लग्नाची मुहूर्तमेढ असेल तर 30-31 ला मेंदीचा कार्यक्रम असणार आहे. 1-2 नोव्हेंबरला चुड्याचा, 5 आणि 6 नोव्हेंबरला हळद, 7ला सीमांत पूजन आणि 8 ते 11 नोव्हेंबरला त्या दोघांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नाच्या मुहूर्त संध्याकाळी 7:30 वाजता लग्नसोहळा पार पडणार आहे.

आता या लग्नसोहळ्यात नवीन काय विघ्न येणार का ? मालिकेत काय घडणार या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी पाहत राहा वीण दोघांतली ही तुटेना दररोज संध्याकाळी 7:30 वाजता.

फक्त योगिता आणि सौरभ नाही हे कलाकारही झाले वर्ष-दीड वर्षात वेगळे !
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.