पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी
Nagpur 23-year-old Instagram reel star Rinky murdered by husband : २३ वर्षीय 'रील स्टार' रिंकी हिच्या हत्येनं उपराजधानी नागपूर हादरले आहे. संशयाची सुई डोक्यात गेल्यामुळे नवऱ्याने २३ वर्षाच्या बायकोच्या डोक्यात सपासप वार केले. रिंकी हिला जखमी अवस्थेत जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण रक्तस्राव जास्त प्रमाणात झाल्याने उपचाराधीच तिचा मृत्यू झाला. नागपूर पोलिसांनी याबाबत तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली. नागपूर पोलिसांनी रिंकीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला अन् नवऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. (Rinky Pradhan murder case latest updates Nagpur police)
२३ वर्षाची रिंकी प्रधान ही इन्स्टाग्रामवर रील तयार करते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. रिंकीचं दुसऱ्याबरोबर अफेअर असल्याचा संशय नवरा किशोर याच्या डोक्यात होता. या संशयातून ३१ वर्षाच्या किशोर प्रधान याने पत्नीचा काटा काढायचा ठरवलं. किशोर आणि रिंकी यांचं या कारामुळे जोरात भांडण झाले होते. रागाच्या भरात किशोर याने हातात आलेल्या वस्तीने रिंकीच्या डोक्यात सपासप वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली.
साताऱ्यानंतर नागपूरमध्ये खाकीवर डाग, पोलिसाने बलात्कार केल्याचा २३ वर्षाच्या मुलीचा आरोप२३ वर्षाची मृत विवाहित रिंकी ही इन्स्टाग्रामवररील बनवायची. तिचे सोशल मीडियावर शेकडो फॉलोअर्स आहेत. आरोपी पती हा मेकॅनिक असून रिंकी फोनवरून दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलत असल्याच्या संशय त्याच्या डोक्यात वारंवार येत होता. त्यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणं झाली होती. या कारणामुळे किशोर याने रिंकीच्या डोक्यावर भारी वस्तूने प्रहार केला. जखमी अवस्थेत रिंकीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
Earthquake : इमारती कोसळल्या, लाईट गेली; जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ; भूकंपामुळे ६.१ रिश्टर स्केलचे हादरेरिंकीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी रूग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी किशोर याने पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न केला. घरात पाय घसरून पडल्याने डोक्याला मार लागल्याचे त्याने पोलिसांना सुरवातीला सांगितले. पण पोस्टमार्टम अहवालात डोक्याला मल्टिपल दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी खाकी दाखवली अन् किशोर पोपटासारखा बोलायला लागला. किशोर याने पत्नी रिंकीचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
Phaltan Doctor Case: पुरावे नष्ट करून सरेंडर, SIT मार्फत चौकशी करा, फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात गावकरी रस्त्यावर