Electric Shock: सिव्हर टॅंक रिकामे करताना हेल्परचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; तिघांविरोधात गुन्हा दाखल
esakal October 29, 2025 01:45 AM

नागपूर : सिव्हर टँक रिकामे करीत असताना विजेचा धक्का लागून हेल्परचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी चालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल कला आहे.

पवन वरटकर (वय २५, हिवरीनगर) असे मृताचे तर पारितोष लाऊत्रे (वय ३९, रा. राणी दुर्गावती चौक), रोहित लाऊत्रे (वय ३०), आशिष बांगर (वय ३०) अशी आरोपींची नावे आहेत. पवन चार महिन्यांपासून पुणे येथील कंपनीत काम करीत होता.

या कंपनीकडून गटार स्वच्छ करण्याचे काम केले जाते. त्यासाठी सिव्हर टॅंक वाहनाचा उपयोग केला जातो. वाहनात जमा होणारी घाण विहिरगाव येथील मनपाच्या पंपिंग स्टेशनच्या ठिकाणी रिकामी करावी लागते.

मात्र, वाहनचालकासह तिघांनीही टँक जबलपूर तरोडीतील फोर लाइन ढाब्यासमोर नेले. तिथे इलेक्ट्रिक लाइनखाली वाहन उभे करून ते पवनला रिकामे करायला लावले. वाहनाचे हायड्रोलिक लिव्हर दाबले.

Akola Crime: जुन्या वादाने गाठली क्रूरतेची परिसीमा; बेपत्ता अक्षय नागलकरची हत्या, आठ आरोपींचा कटात समावेश, चार अटकेत

टॅंक वर गेल्याने वीजवाहिनीला स्पर्ष झाला. त्यामुळे संपूर्ण वाहनात विद्युत प्रवाह आला. वाहनात असलेला पवन विजेच्या धक्क्याने बेशुद्ध झाला. उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. तपासात त्याच्या मृत्यूसाठी तिघेही जबाबदार असल्याचे उघडकीस आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.