Market Today : MCX वर ट्रेडिंग ठप्प! गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण
esakal October 29, 2025 07:45 AM

Multi Commodity Trading Exchange Updates : मंगळवार, 28 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे शेअर बाजारात व्यवहार सुरू झालेत. मात्र, दुसरीकडे देशातील सर्वात मोठ्या कमोडिटी ट्रेडिंग एक्स्चेंजपैकी एक असलेल्या मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर सकाळी ट्रेडिंग सुरूच झाले नाही. साधारणपणे MCX वर सकाळी 9 वाजता ट्रेडिंग सुरू होते, पण आज सकाळी 10 वाजेपर्यंत ते सुरू होऊ शकले नाही.

तांत्रिक बिघाडामुळे व्यवहारात अडथळा

MCX ने संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक समस्येमुळे व्यवहारात अडथळा निर्माण झाला आहे असे म्हटले आहे. सुरुवातीलाच समस्या आल्याने ट्रेडिंग वेळ 9.30 वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आली, त्यानंतर ती 10.30 वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र या वेळेनंतरही ट्रेडिंग सुरू होऊ शकले नाही.  

MCX काय आहे ?

MCX हे भारतातील सर्वात मोठे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज आहे. येथे सोने, चांदी, इतर धातू तसेच शेतीसंबंधित आणि इतर कमोडिटींमध्ये वायदा व्यवहार (Futures Trading) केले जातात. देशातील एकूण कमोडिटी कॉन्ट्रॅक्ट व्यवसायात MCX चा सुमारे 98 टक्के वाटा आहे.

MCX ने संकेतस्थळावर जारी केलेल्या अलर्ट संदेशात म्हटले आहे की, “असुविधेबद्दल आम्हाला खेद आहे. तांत्रिक बिघाडामुळे ट्रेडिंगमध्ये अडथळा आला आहे आणि त्यामुळे, ट्रेडिंग MCX DR साइटवरून केले जाईल."

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, चांदीही घसरली; जाणून आजचा ताजा भाव MCX DR साइट काय आहे ?

MCX Disaster Recovery (DR) Website म्हणजेच आपत्कालीन बॅकअप सिस्टम - जेव्हा मुख्य वेबसाइट किंवा ट्रेडिंग सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड, सर्व्हर फेल होणे, किंवा सायबर हल्ला यांसारखी समस्या निर्माण होते, तेव्हा ही पर्यायी साइट तत्काळ सक्रिय होते. त्यामुळे ट्रेडिंग सुरू ठेवता येतो आणि बाजार पूर्णपणे बंद पडत नाही. म्हणजेच, मुख्य प्लॅटफॉर्म अडचणीत आला, तरीही DR साइटच्या माध्यमातून व्यवहार सुरू ठेवणे शक्य होते.

Share Market Opening : सेन्सेक्स-निफ्टी घसरले, रुपया आणि FIIs विक्रीमुळे दबाव जुलैमध्येही झाली होती अशीच अडचण

MCX वर तांत्रिक बिघाड होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही जुलै 2025 मध्ये अशाच प्रकारच्या तांत्रिक समस्येमुळे व्यवहार ठप्प झाले होते. त्या वेळीही सकाळी 9 वाजता सुरू होणारा व्यवहार जवळपास 1 तासाहून अधिक उशिराने सुरू झाला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.