डॉ. प्रकाश जाधव लिखित 'प्रक्षोभ' कादंबरीचे प्रकाशन
esakal October 30, 2025 02:45 PM

पुणे, ता. २९ : ‘‘गावकुसाच्या आतील आणि बाहेरील अनेक व्यक्तिरेखा डॉ. प्रकाश जाधव यांनी मनोविश्लेषणात्मक पद्धतीने ‘प्रक्षोभ’ या कादंबरीत मांडलेल्या आहेत. बुद्धिवादी संवेदनशील मनाचा प्रकाश या कादंबरीतून दिसतो आहे’’, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
डॉ. जाधव लिखित ‘प्रक्षोभ’ कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी डॉ. सबनीस बोलत होते. ज्येष्ठ लेखक भीमराव पाटोळे, देवा झिंजाड, ‘मसाप’चे कार्यवाह शिरीष चिटणीस, ‘सकाळ प्रकाशन’चे प्रमुख आशुतोष रामगीर, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.