मुंबई बातम्या: मुंबईतील पवई परिसरात एका मानसिक रुग्णाने काही मुलांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आरोपीशी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी मुलांचे कुटुंबीय आणि अनेक स्थानिक लोकही तेथे उपस्थित होते.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मानसिकदृष्ट्या अस्थिर असून त्याने काही मुलांना ताब्यात घेतले आहे. मुलांची सुखरूप सुटका व्हावी यासाठी पोलिसांचे पथक त्याच्याशी सतत संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. ओलीस ठेवलेल्या मुलांची संख्या किती आहे हे सध्या स्पष्ट झालेले नाही.
ही व्यक्ती पोलिसांना काही प्रश्न विचारून त्यांची उत्तरे शोधत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पोलीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून बचावकार्य सावधपणे सुरू आहे.
बातमी अपडेट केली जात आहे…