Summary -
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पडघम वाजले
आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार
१० नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता.
दोन टप्प्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला देखील लागले असून लवकरच निवडणुकींच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. पाच ते सात वर्षांपासून या निवडणुका रखडल्या आहेत. या निवडणुकीला आता मुहूर्त मिळाला आहे. अशामध्येच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम लवकरच वाजणार आहे. ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत निघणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत येत्या ११ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर इच्छूक उमेदवार आणि माजी नगरसेवकांमध्ये उत्सुकतेसह चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून या निवडणुका दोन टप्प्यात होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२६ च्या आतमध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात. या निवडणुकीसाठी आता राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाकडून हालाचाली वाढल्या आहेत.
Local Body Election : धुरळा उडणार, तयारीला लागा! 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, समोर आली अपडेट... असा होणार आरक्षण सोडत कार्यक्रम -- आरक्षित जागांची संख्या निश्चित करुन त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यासाठी ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर रोजी प्रस्ताव सादर करणे.
- आरक्षण सोडतीची जाहिर सूचना ६ नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रात प्रसिध्द करणे.
- आरक्षणाची सोडत ११ नोव्हेंबर २०२५
- सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी ११ नोव्हेंबर रोजी सादर करणे.
- १४ नोव्हेंबर रोजी प्रारुप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाठी विहित नमुन्यात प्रसिध्द करणे.
- २० नोव्हेंबर रोजी प्रारुप आरक्षण हरकती व सूचना मागविण्याचा अंतिम तारीख.
- अंतिम आरक्षण विहित नमुन्यात २८ नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द करणे.
Local Body Election : 10 नोव्हेंबरआधी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता, नेमकी काय माहिती आली समोर? असे असेल आरक्षण -एकूण २२७ जागांपैकी, अनुसुचीत जातीसाठी १५ जागा, अनुसुचित जमातीसाठी २ जागा आणि इतर मागासवर्गीयांसाठी ६१ जागा आरक्षित असणार आहेत. एकूण २२७ जागांपैकी ५० टक्के म्हणजेच ११४ जागा या महिलांसाठी आरक्षित असणार आहेत.
BMC Election : मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंची नवी रणनीती? ठाकरेसेना देणार नव्या चेहऱ्यांना संधी, VIDEO