नीलेश लंके ठाकूर यांच्या भेटीला
पनवेल, ता. २९ (बातमीदार) ः अहमदनगरचे खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी (ता. २८) पनवेलचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान दोघांमध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि ग्रामीण विकासाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. खासदार लंके यांनी या भेटीवेळी रामशेठ ठाकूर यांच्या दीर्घ सामाजिक कारकिर्दीचे आणि लोकाभिमुख कार्याचे विशेष कौतुक केले. रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात रामशेठ ठाकूर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि रोजगारनिर्मिती क्षेत्रात त्यांनी अनेकांना प्रेरणा देणारे काम केले आहे. त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी रामशेठ ठाकूर यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी पनवेल तालुका भाजप अध्यक्ष विजय म्हात्रे, नगरसेवक उपस्थित होते.