Nilesh Ghaiwal: ३ वर्षांत ५८ एकर जमीन खरेदी, कोट्यवधी रुपयांची उलाढाल; निलेश घायवळ प्रकरणात ईडीची एन्ट्री?
Saam TV October 30, 2025 11:45 PM
Summary -
  • निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट

  • ईडी घायवळ प्रकरणाचा तपास करण्याची शक्यता

  • ३ वर्षांत ५८ एकर जमीन खरेदी केल्याचं उघड

  • जमिनीच्या व्यवहारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. निळेश घायवळ प्रकरणाच्या तपासात आता ईडीची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांसह आता ईडी याप्रकरणी तपास करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे पोलिस लवकरच अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीकडे तपासासाठी पत्र पाठवणार आहे. निलेश घायवळने ३ वर्षांत ५८ एकर जमीन घेतली. एवढा पैसा आला कुठून याचा तपास ईडी करण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुंड निलेश घायवळने ३ वर्षांत ५८ एकर जमीन जमवली. जमिनीच्या व्यवहारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्यामुळे निलेश घायवळ प्रकरणी ईडी तपास करण्याची शक्यता आहे. निलेश घायवळचे आर्थिक साम्राज्याचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे. जमिनीचे व्यवहार स्वतःसह आई-वडील, भाऊ, पत्नी आणि नातेवाईकांच्या नावावर आहेत. सध्या पुणे पोलिस या प्रकरणाचा तपास करत असले तरी देखील आता ईडी याचा तपास करण्याची शक्यता आहे.

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

निलेश घायवळने २०२२ ते २०२५ या काळात जामखेड परिसरातील १२ वेगवेगळ्या व्यक्तींकडून जमीन खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यवहारांची किंमत कोट्यवधी रुपयांत असल्याचा अंदाज असल्याने याचा तपासईडीकडून होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आधीच घायवळ आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची १० बँक खाती गोठवली आहेत. घायवळने धाराशीव आणि बीड जिल्ह्यातील सोलार प्रकल्पांचे टेंडर मिळविल्याची देखील माहिती समोर आली आहे.

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

दरम्यान, कोथरूडमध्ये गोळीबार आणि हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून निलेश घायवळ फरार आहे. तो लंडनला पळून गेल्याची माहिती समोर आली होती. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. निलेश घायवळ हा लंडनमध्येच आहे. युके हाय कमिशनने पुणे पोलिसांना ही माहिती दिली. ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निलेश घायवळचा व्हिसा असून तो मुलाच्या शिक्षणासाठी याठिकाणी आला आहे असे देखील सांगण्यात आले. निलेश घायवळच्या अटकेसाठी पुणे पोलिसांकडून हालचालींना वेग आला आहे.

Nilesh Ghaiwal: गुंड निलेश घायवळ लंडनमध्येच, युके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती; अटकेसाठी हालचालींना वेग
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.