Summary:
भाजपच्या महिला नेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली
नवनीत राणा यांना पत्र पाठवत धमकी देण्यात आली
धमकी देणाऱ्याचे हैदराबाद कनेक्शन उघड
पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला
अमरावतीमधील भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नवनीत राणा यांना पत्र पाठवत ही धमकी देण्यात आली आहे. य धमकीमागे हैदराबाद कनेक्शन उघड झाले आहे. धमकी देणाऱ्याने पत्रामध्ये मुलासमोर बलात्कार करू अशी धमकी दिली आहे. धमकीच्या पत्रात पीएम मोदींचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस तपास करत आहेत.
Navneet Rana : हिंदू वाघीण...तू आता काही दिवसांची पाहुणी; नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकीमिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हैदराबाद येथील जावेदने नवनीत राणा यांना पुन्हा धमकी दिली. या प्रकरणी नवनीत राणा यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. आरोपीने पाठवलेल्या धमकीच्या पत्रात 'मुलासमोर बलात्कार करु', अशी धमकी दिली. तसंच, 'तू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बायको आहे.', असा देखील उल्लेख केला आहे.
Navneet Rana Threat: भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी