नवी दिल्ली : अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करारासंदर्भत चर्चा सुरु आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. त्याचा परिणाम भारताच्या निर्यातीवर दिसून आला आहे. अमेरिकेला होणारी भारताची निर्यात कमी होत आहे. मे ते सप्टेंबर 2025 या कालावधीत भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 37. 5 टक्क्यांनी घसरली आहे. निर्यात 8.8 अब्ज डॉलर्सच्या घसरणीवरुन 5.5 अब्ज डॉलर्सवर आली आहे. ही अलीकडच्या वर्षातील मोठी घसरण आहे.
आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेनं 4.5 भारतावर 10 टक्के टॅरिफ लादलं होतं. ऑगस्ट महिन्यापर्यंत ते 50 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. अमेरिकेनं भारतावर 25 टक्के टॅरिफ लादलं आहे. त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं आहे.
टेक्सटाइल, जेम्स-अँड-ज्वैलरी, केमिकल, कृषी उत्पादन आणि मशीनरी या सारख्या श्रम केंद्रीत क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. या क्षेत्राचं निर्यातीतून होणारं उत्पन्न 4.8 बिलियन डॉलरवरुन कमी होऊन 3.2 बिलियन डॉलर राहिलं आहे. म्हणजेच 33 टक्के घसरण झाली आहे. टॅरिफ फ्री उत्पादनांवर आयात शुल्क लादलं जात नाही त्याची निर्यात देखील घटलं आहे. या उत्पादनांची निर्यात 3.4 बिलियन डॉलर्सवरुन घटून 1.8 बिलियन डॉलर्सवर आली आहे म्हणजेच 47 टक्क्यांनी घसरली आहे. स्मार्टफोन आणि औषधांची निर्यात सर्वाधिक प्रभावित झाली आहे.
स्मार्टफोन निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 58 टक्के घसरण झाली आहे. जून महिन्यात 2 बिलियन डॉलरची निर्यात होती जी सप्टेंबरमध्ये 884.6 मिलियन डॉलर्सवर आली आहे. औषध क्षेत्रातील निर्यात 15.7 टक्क्यांनी घटली आहे. इंडस्ट्रियल मेटल आणि ऑटो पार्टसच्या निर्यात घसरण झाली. या क्षेत्रात 16.7 टक्के घसरण झाली. एल्युमिनियममध्ये 37 टक्के, कॉपरमध्ये 25 टक्के, ऑटो पार्ट्समध्ये 12टक्के आणि आयरन-स्टीलमध्ये 8 टक्के घसरण झाली.
जेम्स आणि ज्वेलरीची निर्यात 500.2 मिलियन डॉलरवरुन घटून 202 डॉलरवर आली आहे. म्हणजेच 59.5 टक्के घसरण झाली आहे. सूरत आणि मुंबईच्या यूनिटसवर त्याचा परिणाम झाली आहे. अमेरिकन बाजारात भारताची जागा थायलँड आणि व्हिएतनामनं घेतली आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं असून चीनवर 30 टक्के तर व्हिएतनामवर 20 टक्के टॅरिफ लादलं आहे.
आणखी वाचा