Share Market : या कंपनीला मुंबई मेट्रोचं 2481 कोटींचं काम; गुंतवणुकदारांचे गुडघ्याला बाशिंग, उद्या शेअरमध्ये तुफान येणार?
Tv9 Marathi November 03, 2025 02:45 PM

Titagarh Rail Systems : रेल्वे क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी टीटागड रेल्वे सिस्टिम्स लिमिटेडला मुंबई मेट्रो लाईनची अनेक मोठी कामं मिळाली आहेत. कंपनीला एकूण 2481 कोटींची कामं मिळाली आहेत. याविषयीची माहिती टीटागड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला शुक्रवारी दिली. मुंबई मेट्रो लाईन 5 प्रकल्पातंर्गत हे काम मिळाले आहे. या कार्य निविदेतंर्गत वर्क ऑर्डर अंतर्गत कंपनीकडे डिझाईन, उत्पादन, पुरवठा,जोडणी आणि इतर अनेक कामं मिळाली आहेत. या कामामुळे कंपनी पुन्हा चर्चेत आली आहे. सोमवारी या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी उसळी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुंतवणूकदार उद्या शेअरवर लक्ष ठेऊन असतील.

दोन टप्प्यांसाठी 2481 कोटी

कंपनीनुसार, 2481 कोटी रुपयांचे काम दोन टप्प्यात पूर्ण करायचे आहे. पहिल्या टप्प्यात धमकर नाकापर्यंत तर दुसऱ्या टप्प्यात धमकर नाका ते कल्याण एपीएमसीपर्यंतचे काम पूर्ण करावे लागणार आहे. या कार्य निविदेत कंपनीला ट्रेन कंट्रोल सिस्टिम, टेलिकम्युनिकेशन्स, प्लॅटफॉर्म स्क्रीन डोर्स, रोलिंग स्टॉक ही आणि इतर कामे करावी लागतील. याशिवाय या कंपनीला दोन वर्षांसाठी देखरेखीचे कामही करावे लागेल. या करारानुसार, कंपनीला पहिला टप्पा 108 आठवड्यात सुरु होणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्याचे काम कंपनी हातात घेईल. मुंबई मेट्रोची इतर कामे मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. कंपनीकडे अजूनही इतर प्रकल्प आहेत. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये उसळी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेअर बाजाराची स्थिती काय?

शुक्रवारी टीटागड शेअरमध्ये 1.63 टक्क्यांची तेजी दिसली. मग शेअरमध्ये घसरण आली. हा शेअर 88455 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 27 टक्क्यांचे नुकसान झाले आहे. तर गेल्या सहा महिन्यात हा शेअर 18 टक्के तेजीत होता. गेल्या दोन वर्षांचा विचार करता हा शेअर एकदम जोरदार रिटर्न देण्यात कमी पडला आहे. गेल्या दोन वर्षांत कंपनीचा शेअर अवघा 16.19 टक्क्यांनी वधारला आहे. सेन्सेक्स इंडेक्समध्ये यामध्ये 31 टक्क्यांची तेजी दिसली तर गेल्या पाच वर्षांत टीटागडने गुंतवणूकदारांना 2065 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

कंपनीचा लाभांशाचा उतारा

कंपनीचा शेअर बाजारात गेल्या काही दिवसात चमकला नाही. गुंतवणूकदारांची दूर करण्यात या कंपनीला यश आले आहे. ही कंपनी सातत्याने लाभांश देत आहे. यंदा कंपनीने गुंतवणूकदारांना एक रुपयांचा डिव्हिडंड दिला होता. त्यापूर्वी सुद्धा कंपनीने गुंतवणूकदारांना डिव्हिडंडचे गिफ्ट दिले आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ शेअरची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.