Pune Crime : पैशाच्या वादातून प्रियकराचा कुऱ्हाडीने खून! प्रेयसीला न्यायालयाने सुनावली जन्मठेप
esakal November 03, 2025 09:45 PM

पुणे : पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून प्रियकराचा कुऱ्हाडीने वार करून खून करणाऱ्या महिलेला न्यायालयाने जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा निकाल दिला.

सविता प्रकाश जाधव (वय ३०, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रवीण ज्ञानोबा भाग्यवंत (वय ३०, रा. टाकळे चाळ, विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) याच्या खूनप्रकरणी त्याची पत्नी सुनीता (वय २५) हिने पिंपरी पोलिसात फिर्याद दिली. ही घटना ३ सप्टेंबर २०१८ ला पिंपरीतील एका हाउसिंग सोसायटीच्या चौथा मजल्यावर घडली होती.

या प्रकरणात सरकरी पक्षातर्फे अतिरिक सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी ११ साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. प्रवीण आणि सुनीता यांचे प्रेमसंबंध होते.

Crime: संतापजनक! आधी २७ दिवसांच्या बाळाला संपवलं, नंतर पत्नीकडून पतीच्या गुप्तांगावर वार, धक्कादायक कारण समोर

घटनेपूर्वी तीन महिने दोघांत वाद झाले होते. त्यावेळी सविता आईकडे राहण्यास गेली. तिने पोलिसात तक्रार दिली होती. त्यामुळे ती राहत असलेल्या आईच्या घरी प्रवीण तिला भेटायला गेला होता. तिथे तिने कुऱ्हाडीने त्याच्या मान व डोक्यावर वार करत प्रवीणचा खून केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.