ट्रॅफीक पोलिसांच्या दंडापासून वाचण्यासाठी मोटार सायकलस्वार निरनिराळ्या क्लृप्त्या लढवताना दिसत असतात. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून तो पाहून तुम्हालाही हसू फुटेल. आपली पावती फाडली जाऊ नये म्हणून बाईकस्वाराच्या मागे बसलेल्या व्यक्तीने डोके चक्क कढईने झाकल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. कोणीतरी हा व्हिडीओ मोबाईलने शुट करुन सोशल मीडियावर टाकल्याने युजर त्यावर विविध प्रतिक्रीया देत आहेत.
हा व्हिडीओ सर्वात आधी कर्नाटक पोर्टफोलियो पेज एक्सवर शेअर करण्यात आला होता. या क्लिपमध्ये एका बाईकवर पाठी मागे बसलेला इसम त्याचे डोके मोठ्या कढईने झाकताना दिसून येत आहे. ही बाईक मोठ्या ट्रॅफीकमध्ये अडकलेली आहे. आणि बाईकस्वाराने हेल्मेट परिधान केले आहे. परंतू त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीने डोक्याला कढईने झाकले आहे. कोणत्या तरी वाहन चालकाने हा व्हिडीओ शूट केल्यानंतर तो एक्सवर पोस्ट केला आहे. आधी मजेशीर वाटल्याने या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत.नंतर रस्ते नियमाचे पालन केल्याने या विषयी समाजमाध्यमावर चिंता व्यक्त केली जात आहे.
व्हिडीओवर प्रतिक्रीयासोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर युजर्सने मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रीया दिल्या आहेत. काहींनी यास मजेदार म्हटले आहे तर काहींनी ट्रॅफीक नियमांचे उल्लंघन झाल्याने चिंताही व्यक्त केली आहे. एका युजरने म्हटले आहे की जेव्हा जिंदगी चालान देत असेल तर कढई घ्या. तर दुसऱ्या एकाने लिहिलंय की इनोव्हेशन त्यांच्या सर्वात चांगल्या रुपात. तर अनेकांनी हेल्मेट घालण्यापासून वाचण्यासाठी त्याचा हा जुगाड रिस्की असल्याचे म्हटले आहे.
सोशल मीडियावर कर्नाटक पोर्टफोलियो या अकाऊंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यास कॅप्शन लिहीताना ‘एक फ्राईंग पॅन ऑम्लेट पलट सकता है, खोपडी नही.’ त्याने सर्वांना सल्लाही दिला की हेल्मेट लाईफ सेव्हर आहे, व्हायरल रिल्ससाठी प्रॉप्स नाही. पोस्टमध्ये रायडर्सनी नेहमी योग्य हेल्मेट घालल्याचा सल्ला देऊन रस्त्यावर अशी बेपर्वा वाहतूक करुन रिस्क घेऊ नये असेही लिहिले आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
हेल्मेट संदर्भात जागरूकताबेंगलुरु के ट्रैफिक में एक आदमी चालान से बचने के लिए कढ़ाई से अपना सिर छुपाता हुआ… 😂#viralvideo pic.twitter.com/BggoV0lPEG
— Versha Singh (@Vershasingh26)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर लोकांनी अनेक स्वरुपाच्या रिएक्शन दिल्या आहेत. अनेक युजर्सनी सांगितले की आपले केस खराब होऊ नयेत म्हणून काही लोक हेल्मेट घालत नाहीत. एका माहिती देताना सांगितले की काही जण हेल्मेट ऐवजी कंस्ट्रक्शन साईटवरील काम चलाऊ हेल्मेट वा अन्य हेडगियरचा वापर करतात. केवळ रोड सेफ्टी-अप्रुव्ड हेल्मेटच अपघातात त्यांची सुरक्षा करु शकते हे माहिती असून अनेक अशा प्रकारे जीव धोक्यात घालत आहेत.