आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत सलग 2 सामने जिंकून दणक्यात सुरुवात करणारी टीम इंडिया विजयी ट्रॅकवरुन घसरली आहे. टीम इंडियाला सलग 2 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे टीम इंडियासाठी सेमी फायनलच्या दृष्टीने आता प्रत्येक सामना अटीतटीचा झाला आहे. टीम इंडियाने आतापर्यंत या मोहिमेत एकूण 4 सामने खेळले आहेत. तर पाचव्या सामन्यात टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला विजयी ट्रॅकवर परतायचं असेल तर इंग्लंडला पराभूत करावं लागणार आहे.
इंग्लंड या स्पर्धेत अजिंक्य आहे. इंग्लंडने सलग 3 सामने जिंकले आहेत. तर चौथा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे टीम इंडियाला हा सामना जिंकायचा असेल तर इंग्लंडचा विजयरथ रोखावा लागणार आहे. इंग्लंडला हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित करण्याची संधी आहे. त्यामुळे टीम इंडिया इंग्लंडला रोखणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना केव्हा?टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना रविवारी 19 ऑक्टोबरला होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना कुठे?टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना टीव्हीवर स्टार स्पोर्टस नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
इंग्लंड टीम इंडियावर वरचढएकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात एकूण 79 सामने खेळवण्यात आले आहेत. इंग्लंडने 79 पैकी सर्वाधिक 41 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर महिला ब्रिगेडने इंग्लंडला 36 सामन्यांमध्ये लोळवलं आहे. मात्र जमेची बाजू अशी की टीम इंडियाने इंग्लंड विरूद्धच्या गेल्या 5 पैकी 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे महिला ब्रिगेड रविवारी जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.