वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात आले आहेत. प्रत्येक सामन्यानंतर गुणातलिकेचं गणित बदलताना दिसत आहे. 20 सामन्यानंतर उपांत्य फेरीत तीन संघ पोहोचले आहे. आता एका संघासाठी जोरदार चुरस आहे. (Photo : ICC Twitter) 
 
 ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत 5 पैकी 4 सामने जिंकले आहे. तर एका सामना पावसामुळे ड्रॉ झाला. त्यामुळे एक गुण मिळाला. ऑस्ट्रेलिया 9 गुण आणि +1.818 नेट रनरेटसह पहिल्या स्थानी आहे. उपांत्य फेरीत जागा मिळवणारा पहिला संघ ठरला होता. (Photo : ICC Twitter) 
 
 इंग्लंडच्या बाबतीतही ऑस्ट्रेलियासारखंच झालं आहे. इंग्लंडने 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना ड्रॉ झाला. त्यामुळे 9 गुण आणि +1.490 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी आहे. भारताविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत जागा पक्की केली. (Photo : ICC Twitter) 
 
 दक्षिण अफ्रिकेला या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे पुढे काय अशी स्थिती होती. पण दक्षिण अफ्रिकेने पुढच्या चार सामन्यात सलग विजय मिळवला. 8 गुणांसह दक्षिण अफ्रिकेने उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. (Photo : ICC Twitter) 
 
 भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, बांग्लादेश आणि पाकिस्तान यांच्यात एका जागेसाठी चुरस असमार आहे. सर्व संघांचे प्रत्येकी दोन सामने शिल्लक आहेत. भारत आणि न्यूझीलंडला त्यातल्या त्यात संधी आहे. आता कोणता संघ गुणांसह नेट रनरेट सावरून उपांत्य फेरी गाठतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Photo : ICC Twitter)