Cricket : 5 सामने, 15 खेळाडू, टी 20i सीरिजसाठी संघ जाहीर, पहिला सामना केव्हा?
Tv9 Marathi November 04, 2025 10:45 AM

अवघ्या काही महिन्यांवर टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धा येऊन ठेपली आहे. या स्पर्धेसाठी एकूण 20 संघ निश्चित झाले आहेत. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बहुतांश संघ कसोटी आणि एकदिवसीयऐवजी टी 20I मालिका खेळत आहेत. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूला वेस्ट इंडिज क्रिकेट टीम भारत, बांगलादेशनंतर आता न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. विंडीज न्यूझीलंड दौऱ्यात टी 20I, वनडे आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे.

5 सामने आणि 1 मालिका

विंडीजच्या न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात टी 20I मालिकेने होणार आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20I सामने होणार आहे. या मालिकेचा थरार हा 5 ते 13 नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे. पाहुण्या विंडीजने या टी 20I मालिकेसाठी 48 तासांआधी अर्थात 3 नोव्हेंबरला 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. शाई होप विंडीजचं नेतृत्व करणार आहे. विंडीज क्रिकेटने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

विंडीज टीममधून कुणाला डच्चू?

न्यूझीलंड विरूद्धच्या या मालिकेतून फिरकीपटू गुडाकेश मोती याला वगळण्यात आलं आहे. मोतीला संघात संधी देण्यात आलेली नाही. तसेच मोतीच्या बॉलिंग एक्शनवरूनही क्रिकेट वर्तुळातून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मॅथ्यू फोर्डची या मालिकेतून टी 20I संघात पुनरागमन झालं आहे. मॅथ्यूला दुखापतीमुळे गेल्या काही मालिकांना मुकावं लागलं होतं. मात्र आता मॅथ्यू कमबॅकसाठी सज्ज झाला आहे.

विंडीजचं पराभवानंतर दमदार कमबॅक

दरम्यान नेपाळने विंडीजचा 3 क्रिकेट सामन्यांच्या टी 20I मालिकेत 2-1 ने धुव्वा उडवला. त्यानंतर विंडीजने जोरदार कमबॅक केलं. विंडीजने बांगलादेशचा त्यांच्याच घरात टी 20I मालिकेत 3-0 ने सुपडा साफ केला. त्यामुळे आता विंडीजचा विश्वास वाढलेला आहे. मात्र विंडीजसमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. त्यामुळे विंडीजचा न्यूझीलंडसमोर कस लागणार आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20i मालिकेचं वेळापत्रक

The squad is IN!💥

CWI names the T20I team to face New Zealand.

Read More⬇️https://t.co/jUzfNaJpsf pic.twitter.com/vjEkMIZDR7

— Windies Cricket (@windiescricket)

टी 20I सीरिजसाठी विंडीज टीम : शाई होप (कॅप्टन), एलिक अथानजे, अकीम ऑगस्टे, रोस्टन चेज, मॅथ्यू फोर्ड, जेसन होल्डर, अकील होसेन, आमीर जांगू, ब्रँडन किंग, खारी पियरे, रोवमॅन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, जेडन सील्स, रोमारियो शेफर्ड आणि शमर स्प्रिंगर.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.