“वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिलांच्या चमूने दैदिप्यमान कामगिरी केली आहे. त्या बद्दल मंत्रिमंडळाने अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केलाय. त्याचप्रमाणे त्या टीममध्ये आपल्या महाराष्ट्रातील तीन खेळाडू आहेत, स्मृती मांधना, जेमिमा रॉड्रीग्स आणि राधा यादव या तिन्ही खेळाडूंचा सत्कार राज्य सरकारच्यावतीने केला जाणार आहे. आपल्या धोरणानुसार त्यांना कॅश प्राइज दिलं जाईल. भारताची मान उंचावणाऱ्यांचा सर्व प्रकारे सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या काळात जेव्हा शक्य असेल, संपूर्ण टीम मुंबईत असेल, त्या टीमचा सत्कार करु” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“महात्मा फुले जनारोग्य योजना आहे, त्यात आतापर्यंत 1300 आजार अधिसूचित केले होते. त्यात आता वाढ करुन 2400 आजारांचा समावेश केला आहे. या योजनेतंर्गत सर्व नागरिकांकरिता पाच लाखापर्यंत सर्व खर्च केला जाईल. काही आजार असे चिन्हीत केले आहेत, ज्यात अधिकचा खर्च आहे. 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त खर्च देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अनेक आजारांचे पॅकेज हे नवीन रेटने काही ठिकाणी दुप्पट केलं आहे. महाराष्ट्रातील गोरगरीबांना मोफत चांगले उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय” अशी माहिती देवेंद्र फडणवीसयांनी दिली.
बिबट्यांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“पुणे जिल्ह्यात बिबट्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. ही दुर्देवी घटना आहे. पुणे, नगर जिल्ह्यात 1300 बिबट्यांच विचरण सुरु आहे. केंद्र सरकारशी यावर चर्चा सुरु आहे. प्राथमिक बोलणं झालय. केंद्रीय वनमंत्र्यांशी चर्चा करतोय. या संदर्भात वळसे-पाटील आले होते, त्यांनी हा सुर्व मुद्दा गंभीरतेने मांडला. केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की, हे बिबटे पकडून रेस्क्यू सेंटरकडे देण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करणार आहोत. त्या सोबत मोठ्या प्रमाणार स्टरलायजेशन धोरण राबवण्याची परवानगी द्यावी. ही संख्या मोठी झालेली आहे. स्टरलायझेशन प्रोग्रॅम करण्याची परवानगी मागणार आहोत. बिबट नरभक्षी होतो, तेव्हा पुटडाऊन करण्याची परवानगी मागणार आहोत” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.