सध्या फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्येच नाही तर संपूर्ण जगात युद्धाचे वातावरण बघायला मिळतंय. चीन, पाकिस्तान यांच्यासह उत्तर कोरिया देखील अण्वस्त्र चाचण्यांचे परीक्षण करत आहे. अमेरिकेने याबद्दलचा खुलासा केला. भारताच्या शेजारील दोन्ही देश अण्वस्त्र चाचण्यांचे परीक्षण करत असल्याने भारताने सावध भूमिका घेतली. भारतानेही हालचाली सुरू केल्या आहेत. चीनने चांगलाच धसका घेतला. पश्चिमेकडील देशांच्या पाठोपाठ भारतीय लष्कराने सेना, हवाई दल आणि नौदल आता पूर्व सीमेवर सराव करणार आहेत. “त्रिशूल” लष्करी सरावामुळे पाकिस्तान आधीच हादरला आहे. 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान अरुणाचल प्रदेशमध्ये ‘पूर्वी प्रचंड प्रहार’ नावाचा युद्ध सराव आयोजित केला जाईल.
या युद्ध सरावात भारताचे तिन्ही दल असतील, याचाच धसका पाकिस्तानह चीनने घेतला. तोफखाना, यांत्रिक युनिट्स, ड्रोन आणि अचूक हवाई हल्ले या सर्वांचा अभ्यास होईल.हवाई देखरेख आणि लॉजिस्टिक सपोर्टद्वारे नौदल देखील या जमिनीवर आधारित सरावात सहभागी होईल. या युद्ध सरावाबद्दलची सविस्तर माहिती संरक्षण जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी दिली. या सरावाचे मुख्य वैशिष्ट्य विशेष दल आहे.
पूर्वी प्रचंड प्रहार सुरू होण्याच्या अगोदर भारतीय सैन्य पश्चिम सीमेवर त्रिशूल सराव करतंय. राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवर होणाऱ्या या सरावात लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या तुकड्यांचा समावेश असणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय सैन्य रशियात देखील युद्ध सराव करण्यासाठी गेले होते. आता हा भारतीय सैन्याचा सर्वात मोठा युद्ध अभ्यास असणार आहे.
इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, एकात्मिक युद्धभूमी संप्रेषण प्रणालींची चाचणी घेणे ही मुख्य उद्धिष्ट आहेत. 30 ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या या सरावात भारतीय हवाई दलाचे लढाऊ आणि वाहतूक विमाने लष्कराच्या स्ट्राइक फॉर्मेशन्ससह एकत्रितपणे कार्यरत असणार आहेत. अमेरिकेने दावा केला की, पाकिस्तान आणि चीन दोन्ही देश अण्वस्त्र चाचण्या करत आहेत, आता भारताच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भारत देखील अण्वस्त्र चाचणी करणार का? यावर लवकरच भारताकडून प्रतिक्रिया येईल.