विशाखापट्टणम :
आंध्रप्रदेशच्या अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्dयात मंगळवारी पहाटे रिश्टर स्केलवर 3.7 तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे. या भूकंपाचे धक्के विशाखापट्टणम जिल्ह्यातही जाणवले आहेत. या भूकंपामुळे कुठल्याही प्रकारची जीवित किंवा आर्थिक हानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. भूकंपाचा धक्का पहाटे 4.91 वाजता जाणवला. या भूकंपाचे केंद्र जमिनीत 10 किलोमीटर खोलवर होते असे आंध्रप्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.