AUS vs IND : चौथा आणि निर्णायक सामना, टीम इंडिया आघाडीसाठी सज्ज, किती वाजता सुरुवात होणार?
GH News November 06, 2025 03:14 AM

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने 5 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर मात करत तिसऱ्या टी 20I मध्ये विजयाचं खातं उघडलं. भारतीय संघाने रविवारी 2 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना 5 विकेट्सने सामना जिंकला. भारताने यासह दुसऱ्या सामन्यातील पराभवाची परतफेड करत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यानंतर आता चौथा सामना हा मालिकेच्या दृष्टीने फार निर्णायक असा आहे. टीम इंडियाला मालिका जिंकायची असेल तर चौथा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागेल. मात्र चौथा सामना गमावल्यास टीम इंडियाची मालिका विजयाची संधी राहणार नाही. हेच समीकरण यजमान संघालाही लागू आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळण्याची तीव्र शक्यता आहे. हा चौथा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20i सामना कधी?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20i सामना गुरुवारी 6 नोव्हेंबरला होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20i सामना कुठे?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20i सामना कॅरारा ओव्हल, क्वीन्सलँड येथे होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया चौथ्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया चौथ्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजून 15 मिनिटांनी टॉस होईल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20i सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया चौथा टी 20i सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

कॅरारा ओव्हलमधील तिसरा टी 20i सामना

दरम्यान कॅरारा ओव्हलमध्ये तब्बल 3 वर्षांनंतर टी 20i सामना होत आहे.या मैदानात आतापर्यंत एकूण 2 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात हे 2 सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाला या मैदानातील आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत व्हावं लागलं होतं. तर ऑस्ट्रेलियाने या मैदनातील आपल्या दुसऱ्या टी 20i सामन्यात विंडीजवर मात केली होती. आता ऑस्ट्रेलियाचा टीम इंडिया विरुद्धचा या मैदानातील एकूण तिसरा टी 20i सामना असणार आहे. त्यामुळे टीम इंडिया या मैदानात विजयाचं खातं उघडत मालिकेत आघाडी घेणार का? याची प्रतिक्षा चाहत्यांना लागून आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.