भारतात आपण कोणाचे स्वागत करताना त्यांना चहा देत असतो. अनेकांची सकाळ तर चहा प्यायल्याशिवाय होतच नाही. त्यामुळे चहा पिण्याचे प्रमाण आपल्याकडे सर्वाधिक आहे. अनेकांना दूधाचा चहा पसंत असतो. तर काहीजण कोरा चहाच पिणे पसंद करतात. मात्र कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे प्रसिद्ध गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट यांनी चहा पिताना सावध राहाण्याचा सल्ला दिला आहे.
चहा पिण्याचे सवय मूळा चांगली नसून शक्य तितक्या लवकर ती सोडावी असे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे प्रसिद्ध गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि हेपेटोलॉजिस्ट डॉ. दीपक भांगले यांनी म्हटले आहे. जेवढा जास्त चहा प्याल तेवढे प्रकृतीसाठी चांगले नाही. त्यात जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने चहा पित असाल तर तुमच्या पोटासाठी ते चांगले नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
कसे पिता चहा ?बहुतांशी लोक चहा पिताना सकाळी रिकाम्या पोटी पितात आणि तिही कडक चहा पितात. किंवा चहा सोबत बिस्कीट, टोस्ट, खारी, मठरी खातात. चहा पिण्याची ही पद्धत हळूहळू तुमच्या लिव्हरला डॅमेज करु शकते. आणि आतड्यांचेही नुकसान करु शकते. चहात टॅनिन नावाचे तत्व असते. जे शरीरात मिसळते. जर तुम्ही खूप कडक चहा पित असाल तर त्याने पोटात एसिडीटी आणि छातीत जळजळ होऊ शकते.
चहा आणि स्नॅक्सचहा सोबत मसालेदार, तळलेले – भाजलेले स्नॅक्स पदार्थ खात असाल तर हे पोटाच्या पडद्याला ( अस्तराला ) कमजोर करतात. त्यामुळे पोटात अधिक एसिड तयार होते. जेऊन उशीरा पचते. त्यामुळे पोटदुखी, अपचन, बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.
चहा कसा प्यावा ?तुम्ही चहाचे प्रमाण थोडे कमी करु शकला तर चांगले आहे. जर करु शकत नसाल तर चहा कधीही उपाशी पोटी पिऊ नका. हल्का नाश्ता करुन चहा प्यावा. नाश्त्यात काहीही हेल्दी पर्याय निवडा. सकाळी आधी कोमट पाणी प्या आणि नंतर चहा पिऊ शकता. हर्बल आणि आल्याचा चहा प्या आणि त्यात साखर कमी टाका. साखर आतड्यातील गुड बॅक्टेरियांना संपवत असेही डॉ. भांगले यांनी म्हटले आहे.