तुमच्या घरात दररोज सकाळी येणारं दूध शुद्ध आहे की भेसळीचं? आता एका सेंकदात ओळखा, जाणून घ्या सर्वात सोपी ट्रीक
Tv9 Marathi November 06, 2025 03:45 AM

आज अशी परिस्थिती आहे, की बाजारात मिळणारा कोणताही पदार्थ तुम्हाला शुद्ध मिळेलच याची खात्री राहिलेली नाहीये, त्याचा परिणाम हा तुमच्या आरोग्यावर होत आहे, सध्या तर दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे. दूध वाढवण्यासाठी, त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ मिसळले जातात, कहर म्हणजे काही ठिकाणी तर तुम्हाला दुधाच्या नावाखाली भलतेच पदार्थ विकले जात आहेत, मात्र तुम्हाला ते शुद्ध दूध आहे की, बनावटी हे देखील ओळखता येत नाही, त्यामुळे आज सर्वांचंच आरोग्य धोक्यात आलं आहे, आज आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या ट्रीक सांगणार आहोत, ज्या द्वारे तुम्हाला तुमच्या घरी दररोज सकाळी येणारं दूध हे शुद्ध आहे की, त्यामध्ये कशाची भेसळ केलेली आहे? हे अवघ्या काही सेकंदांमध्ये ओळखता येईल.

तुम्ही जेव्हा घरी दूर आल्यानंतर ते खराब होऊ नये म्हणून त्याला उकळतात, तेव्हा तुम्ही ज्या भांड्यात दुधाला उकळतात त्या भांड्याचा तळ चेक करा. जे शुद्ध दूध असतं त्याच्या भांड्याच्या तळाशी तुम्हाला पिवळसर साय दिसू येईल, मात्र ज्या दुधामध्ये भेसळ आहे, त्या दुधाच्या भांड्याच्या तळाशी तुम्हाला पांढरी साय दिसते, त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही दूध उकळून थंड करता तेव्हा त्या दुधावर जाडसर पिवळी साय आली तर समजून जा त्या दुधामध्ये कोणतीही भेसळ नाही, मात्र जर त्या दुधावर पातळ आणि पांढरी साय आली असेल तर अशा दुधामध्ये कशाचीतरी भेसळ असू शकते.

एका काचेच्या ग्लासमध्ये थोड दूध घ्या, आणि त्यात त्यानंतर थोड्या अंतरावरून दुधाचे एक ते दोन थेंब टाका, जर ते दुधाचे थेंब थेट तळाला गेले तर समजून जा की ते दूध शुद्ध आहे, मात्र तुम्ही वरून टाकलेले थेंब हे जर वरच तरंगले तर समजून जा की त्या दुधामध्ये पाण्याची भेसळ आहे. तुम्ही जेव्हा दूध खरेदी करता तेव्हा त्यातील तीन ते चार थेंब जमिनीवर टाकून बघा, ते थेंब जर लगेचच जिरले तर समजून जा त्या दुधामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे, मात्र हे दुधाचे थेंब जमिनीवर देखील घट्ट दिसले तर ते दूध शुद्ध आहे असं मानावं. अनेक दुकानदार दुधाला घट्ट करण्यासाठी त्यामध्ये स्टार्च किंवा पीठ मिक्स करतात, तुमच्या दुधामध्ये असा काही प्रकार करण्यात आला आहे का हे ओळखण्यासाठी सोपी ट्रीक आहे, एका चमच्यामध्ये थोडं दूध घ्या आणि त्यामध्ये आयोडीन मिक्स करा जर दुधाचा रंग निळा झाला तर समजून जा की त्यामध्ये भेसळ आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.