पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP Ajit Pawar) यांच्या पक्षातील रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) या एकमेकींच्या विरोधात मैदानात उतरल्याचा दिसून येत आहे. त्या दोघींमध्ये वाद नेमका काय आहे, रोष काय आहे, कुठून सुरूवात झाली, याबद्दल रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.
रूपाली ठोंबरे पाटील यांनी लगाव बत्ती या यूट्यूब चँनलला मुलाखत देताना सांगितलं की, माझं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यासोबत काही भांडण नाही. कोणताही वाद नाही. मी माझी त्यांच्याशी स्पर्धा समजत नाही, मी एक माजी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. उलट मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नव्हते. तेव्हा स्वतःहून त्यांनी माझ्याशी मैत्री केलेली. त्या माझी मैत्रीण होत्या. माझा त्यांच्याशी कोणताच वाद नाही पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यानंतर त्यांच्या वागण्यात ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याशी ही मला काही घेणं देणं नाही, परंतु आत्ता दोन-चार दिवसांपासून जो काही प्रकार बघत आहात. ती सुरुवात मी तुम्हाला सांगते, फलटणमध्ये डॉक्टरची आत्महत्या झाली. राज्य महिला आयोग हा राज्यातील माता भगिनींसाठी आहे, महिलांचे सक्षमीकरण सुरक्षा आणि ज्या पिडीतेवर अन्याय झाला आहे, त्यांना न्याय देण्यासाठी पोलीस तपास नीट करतात की नाही, याच्यासाठी आहे.
डॉक्टरची आत्महत्या झाल्यानंतर आयोगाच्या अध्यक्षा मॅडम फलटणमध्ये जातात तिथे सगळ्यांना विश्वास देण्यापेक्षा त्यांनी पीडितेच चारित्र्य हनन केलं आणि त्यानंतर महाराष्ट्रातील जनता भगिनी चिडल्या आणि आयोगावर टीका सुरू केले. या टिकेचा एक डिबेट एका चँनलवर होतो, त्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या डॉक्टरची बहीण होती, आत्महत्या केलेल्या डॉक्टर आतेभाऊ होता जो फिर्यादी आहे, त्यांनी मला प्रश्न केला पिडीतेच चारित्र्य हनन तुमच्या पक्षाच्या नेत्या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत त्या कशा करू शकतात. त्यावेळी पक्षाचे प्रवक्ता म्हणून जेवढा नॉलेज पण आहे आणि मी सुज्ञ देखील आहे, त्या आमच्या पक्षाच्या पदाधिकारी जरी असल्या तरी त्या आता अत्यंत संविधानिक पदावरती आहेत, त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. ते स्वतंत्र आणि स्वायत्त आहे त्यांनी जे काही त्या पीडित बद्दल मत दिलं आहे, ते संपूर्णतः चुकीचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्याशी सहमत नाही हे माझं स्टेटमेंट होतं.
हा वाद मी राष्ट्रवादी पक्षात आल्यानंतर झाला. माझी कामाची जी पद्धत आहे मला सगळ्यांना एकत्र घेऊन काम करायला आवडतं. आणि काम करत असताना मी समोरच्याला शत्रू समजत नाही. मग ती मैत्री होते. विरोधी पक्षातील जरी कोणी असेल तरी माझी त्यांच्याशी चांगली मैत्री होते. आता त्या दोस्तीमध्ये चाकणकर बाईंना काही चुकीचं वाटत असेल किंवा चाकणकरांच्या सातत्याने येणाऱ्या चुकीच्या स्टेटमेंट मध्ये मी त्यांची बाजू नाही घेऊ शकत. कारण तुम्ही समाजविरोधी किंवा जे कायद्याला धरून नाही असं जर तुम्ही महत्त्वाच्या पदावर बसून बोलणार असाल तर मी कशी त्यांची बाजू घेणार? ज्यांना त्यांची बाजू बरोबर वाटते त्यांनी त्यांची बाजू घ्यावी. तो राग त्यांना आहे. तो राग त्यांना असला तरी माझा त्यांच्याशी असा काही संबंध येत नाही. कारण मी प्रवक्ता म्हणून काम करत होते. त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. परंतु पक्षातील ज्या काही महिला आहेत, त्यांना रूपाली चाकणकरांनी पदावरनं काढलं, काम न करू देत नाहीत अशा अनेक गोष्टी आहेत, त्याच्या तक्रारी देखील माझ्याकडे आल्या होत्या. मात्र मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही या तुमच्या तक्रारी सुनील तटकरे आणि अजित पवार किंवा सुनेत्रा पवार यांच्याकडे द्या. हेच या तक्रारींचा निवारण करू शकतात. प्रवक्ता म्हणून मी माझ्या पक्षाची बाजू मांडणे एखाद्या गोष्ट समजून सांगणे ते मला उपजत जमत त्याला मी काय करू शकत नाही. त्यात मी वकील आहे, मला जर एखादी घटना तुम्ही सांगितली तर मी त्याबाबत कायद्याच्या किती त्रुटी आहेत, कायदेशीर किती आहे हे समजतं. त्यांना त्याचा रोष असेल तर मी काहीच करू शकत नाही.
मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर पक्षातील इतर ज्या जुन्या 25-25 वर्ष काम करणाऱ्या पक्षातील महिला आहेत, त्यांच्यासोबत माझं छान जमतं. पण या मॅडमला ते जमत नाही. तो त्यांचा रिपो नाही आणि तसंही मी त्यांच्याशी काही बोलायला जात नाही. हा एकच रोष आहे. त्यांचं पक्षातील वागणं आपण पक्षातील इतर महिलांना विचारलं तर त्या मीडियामध्ये यायला घाबरतात. त्या महिलांनी त्याचा तक्रारी सुनील तटकरे यांच्याकडे दिल्या होत्या, त्या कोणत्याही तक्रारींचं निवारण करण्यात आलेलं नाही. माझ्यासमोर त्या महिलांवर अन्याय होत होता. त्या पक्षातील महिला त्यांचा न्याय प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे मागत होत्या. माझा त्याच्यात काहीच रोल नव्हता. शांत बघत होते. ज्याप्रमाणे त्या महिलांना त्रास देणे सुरू होतो तसंच माझी शिकार करण्याची त्या प्रयत्न करत असतील तर मी अशी नाही. आओ शिकार करके जाओ, तुम्ही संविधानिक पदावर बसलेले आहेत. या राजकारणात कोणताही मंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, मंत्री असतील, यांना कोणताही अधिकार दिलेला नाही की त्या पदावर जाऊन तुम्ही लोकांना त्रास द्यायचा. चाकणकरांचा खूप घाण वागण्याचा विषय म्हणजे त्या आपल्याच पक्षातील लोकांमध्ये बाहेरच्या आणून त्यांना तयार करून जी तक्रार दाखल करता येत नाही ती तक्रार दाखल करायला लावणे, षडयंत्र रचने. आम्ही पक्षात १९ जण प्रवक्ते आहोत. जर मी म्हणलं की मी प्रवक्त आहे, 19 जण द्यायची नाहीत. आणि जर मी म्हटलं की ह्या 19 जणांनी माझ्या अधिकाराखाली वागायचं. असं चालत नाही. हा पक्ष आहे. असं चाकणकर पक्षामध्ये घडवत आहेत. त्रास होणाऱ्या लोकांनी त्यांची तक्रार प्रांताध्यक्षांकडे केलेली आहे. त्याच्यावर कारवाई झाली नाही त्यामुळेच हा विषय इतका मोठा झाला आणि उद्रेक झाला. ही कारवाई त्याच वेळी झाली असती तर आज ही वेळ आली नसती असंही रूपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा