पदरात दोन मुलं असताना नवरा-बायकोला समजलं ते तर भाऊ-बहिण, एका मेडिकल रिपोर्टमधून हादरवून टाकणारं सत्य समोर
Tv9 Marathi November 06, 2025 07:45 PM

अनेकदा काही जण सहज म्हणून एखादी वैद्यकीय तपासणी करतात. त्यांना वाटतं की फार काही निघणार नाही. पण एखाद्यावेळी धक्कादायक निदान होतं. कल्पना, विचार केला नसेल अशी गोष्ट समोर येते. अशीच गोष्ट ऑस्ट्रेलियात एका जोडप्याच्या बाबतीत घडली आहे. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने मजा मस्तीमध्ये आपली डीएनए टेस्ट केली. पण या टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर जोडप्याच्या सात जन्माच्या नात्याला मोठा झटका बसला. या रिपोर्टमुळे सासऱ्याचे काळे कारनामे उघड झाले.

महिलेने तिची ही अजब स्टोरी सोशल साइट Reddit वर शेअर केली आहे. महिलेला बालपणापासून माहित होतं की, डोनरच्या माध्यमातून तिचा जन्म झालाय. तिचे वडिल स्पर्म डोनर होते. महिलेने पतीसोबत मिळून मजा मस्तीमध्ये AncestryDNA टेस्ट केली. एखाद लांबच नातं निघेल अस त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी डीएनए टेस्ट केली.

चेहऱ्यावरचे रंगच उडाले

पण रिपोर्ट आल्यानंतर तो वाचून महिलेच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. कारण तिचा डीएनए पतीशी मॅच होत होता. रिपोर्टमध्ये 99 टक्के मॅचसह हे चक्रावून टाकणारं सत्य समोर आलं. म्हणजे ती ज्याला पती समजत होती, तो तिचा सावत्र भाऊ निघाला.

कडव्या सत्यावर शिक्कामोर्तब झालं

आधी या जोडप्याला वाटलं की, रिपोर्टमध्ये काही चूक असेल. पण पुन्हा फेरतपासणी केल्यानंतर कडव्या सत्यावर शिक्कामोर्तब झालं. महिलेचे सासरे एक स्पर्म डोनर होते. पण त्यांनी ही गोष्ट सगळ्या कुटुंबापासून लपवून ठेवलेली. या डीएनए टेस्टने सिद्ध केलं की, या जोडप्याचे बायोलॉजिकल वडील एकच व्यक्ती आहे. म्हणजे ते दोघे एकाच डोनरची मुले आहेत. अनेक वर्षांपासून विवाहित असलेल्या या जोडप्याला दोन मुलं आहेत. मजा मस्तीमध्ये केलेल्या या टेस्टने त्यांना पार हादरवून टाकलं.

मी काय करु

रेडिट वर महिलेने आपल्या भावना व्यक्त करताना लिहिलं की, “मी माझ्या नवऱ्यावर भरपूर प्रेम करते. पण आता मला कळत नाहीय की, मी काय करु. या एका सत्याने आमच्या आनंदी आयुष्यात वादळ आणलय” महिलेची ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली. नेटिझन्स यावर भरपूर रिएक्ट करतायत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.