टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा चौथ्या टी 20I सामन्यात 48 धावांनी धुव्वा उडवला आहे. भारताने ऑस्ट्रेलियसमोर 168 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र कांगारुंना भारतीय गोलंदाजांसमोर 50 ओव्हरही खेळता आलं नाही. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 18.2 ओव्हरमध्ये 119 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने यासह या मालिकेतील एकूण आणि सलग दुसरा विजय मिळवला. भारताने या विजयासह मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली आहे. या विजयामुळे भारताची मालिका विजयाची संधी वाढली आहे. तर ऑस्ट्रेलियासमोर पाचव्या आणि अंतिम सामन्यात मालिका बचावण्याचं आव्हान असणार आहे.