शेजारच्या बांग्लादेशात शेख हसीना सत्तेतून बेदखल झाल्यापासून विनाकारण भारताला डिवचण्याचे प्रकार सुरु आहेत. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांची पाकिस्तानशी जवळीक वाढली आहे. त्यातून भारताला रणनितीक शह देण्याच्या योजना बनवल्या जात आहे. बांग्लादेशात हिंदुंवर अत्याचार सुरु आहेत. भारताला कसा ना कसा त्रास होईल,असा बांग्लादेशच्या युनूस सरकारचा प्रयत्न असतो. याच बांग्लादेशला आता भारताने चांगलाच धडा शिकवला आहे. बांग्लादेशात कांद्याचा दर गगनाला भिडला आहे. काही दिवसातच बाजारात कांद्याच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत. सर्वसामान्यांच्या किचनच बजेट कोलमडून गेलं आहे. राजधानी ढाकासह अनेक शहरात चितगाव, राजशाही आणि खुलनाच्या बाजारात कांद 110 ते 120 टक्के प्रतिकिलोने विकला जात आहे.
BBC बांग्लाच्या एका बातमीनुसार बांग्लादेशात देशांतर्गत कांद्याचा स्टॉक संपण्याच्या मार्गावर आहे. त्यावर भारतातून कांद्याची आयात थांबवली आहे. भारत सरकारने कांद्याच्या देशांतर्गत किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याची निर्यात रोखली आहे. त्याचा थेट परिणाम बांग्लादेशच्या बाजारावर झाला आहे. चितगाव आणि राजशाहीच्या कांदा आयातकांच म्हणणं आहे की, जो पर्यंत भारतातून आयात सुरु होत नाही किंवा नवीन पिक बाजारात येत नाही. तो पर्यंत कांद्याचे भाव वाढू शकतात.
कंज्यूमर असोसिएशन ऑफ बांग्लादेशच म्हणणं काय?
कंज्यूमर असोसिएशन ऑफ बांग्लादेशच म्हणणं आहे की, कांद्याच्या किंमतीमधील ही वाढ योग्य नाहीय. काही व्यापारी आर्टिफिशियल क्राइसिस म्हणजे कुत्रिम कमतरता दाखवून भाव वाढवत आहेत. जेणेकरुन सरकार लवकरात लवकर आयातीला परवानगी देईल.
यावेळी उशिर झालाय
देशाच्या काही भागात रबी सीजनमध्ये कांद्याचं पीक उशिराने येत आहे. ऑक्टोंबरच्या मध्यमापर्यंत कांद्याच्या पिकाची कापणी होते. पण यावेळी उशिर झालाय. आयातदार आणि व्यापाऱ्यांच म्हणणं आहे की, सरकारने लगेच आयातीची परवानगी तर पुढच्याच दिवशी बाजारात भाव उतरतील. बांग्लादेशची अलीकडे भारतविरोधी भूमिका वाढली आहे. पाकिस्तानने बांग्लादेशला त्यांच्या कराची बंदराचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. याद्वारे भारताची रणनिती कमकुवत करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे.