AUS vs IND : ऑस्ट्रेलियासमोर 168 रन्सचं टार्गेट, टीम इंडिया सलग दुसरा विजय मिळवणार?
Tv9 Marathi November 06, 2025 08:45 PM

भारतीय क्रिकेट संघाने चौथ्या टी 20I सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 168 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने संपूर्ण 20 ओव्हर खेळून काढल्या. मात्र त्यानंतरही टीम इंडियाला 170 पार मजल मारता आली नाही. भारताच्या सलामी जोडीने 56 धावांची अप्रतिम भागीदारी केली. टॉप ऑर्डरमधील पहिल्या 4 फलंदाजांना चांगली सुरुवातही मिळाली. मात्र त्यापैकी एकालाही अर्धशतकापर्यंत पोहचता आलं नाही.तर मिडल आणि लोअर ऑर्डरमधील फलंदाजांना काही करता आलं नाही. ऑस्ट्रेलियाने भारताला 46 धावांच्या मोबदल्यात 6 झटके दिले. त्यामुळे भारताची घसरगुंडी झाली. मात्र अखेरच्या क्षणी अक्षर पटेल याने 21 धावा केल्या. त्यामुळे भारताला 167 धावांपर्यंत पोहचता आलं. आता टीम इंडियाचे गोलंदाज या धावांचा बचाव करत मालिकेतील एकूण आणि सलग दुसरा विजय मिळवून देणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने भारतासाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 56 रन्स जोडल्या. भारताने अभिषेकच्या रुपात पहिली विकेट गमावली. अभिषएकने 28 धावा केल्या.  त्यानंतर ऑलराउंडर शिवम दुबे याला तिसर्‍या स्थानी बढती दिली. शिवम सेट झाला होता. मात्र शिवमला ऑस्ट्रेलियाने वेळीच रोखलं आणि मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. शिवमने 18 बॉलमध्ये 22 रन्स केल्या.

शुबमन-अभिषेकच्या सर्वाधिक धावा

Innings Break!#TeamIndia post a total of 167/8 on the board.

Shubman Gill top scores with 46 runs.

Scorecard – https://t.co/Iep4K7ytVn #TeamIndia #AUSvIND #4thT20I pic.twitter.com/XfDwD9bRCz

— BCCI (@BCCI)

टीम इंडियाची पडझड

शिवम आऊट होताच टीम इंडियाची घसरगुंडी सुरु झाली. भारताच्या सलामी जोडीने अर्धशतकी भागादारी मिळवून दिली होती. मात्र भारताच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांना अपवाद वगळता या सुरुवातीचा फायदा करुन घेता आला नाही. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला झटपट 6 झटके दिले. शिवम दुबे 22, शुबमन गिल 44, सूर्यकुमार यादव 20, तिलक वर्मा 5, जितेश शर्मा 3 आणि वॉशिंग्टन सुंदर याने 12 धावा केल्या. भारताची अशाप्रकारे 88-1 वरुन 152-7 अशी स्थिती झाली.

अक्षर पटेलची निर्णायक खेळी

त्यानंतर भारताने अर्शदीप सिंह याच्या रुपात आठवी विकेट गमावली. अर्शदीपला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर अक्षर पटेल याने वरुण चक्रवर्ती याच्या सोबतीने अखेरच्या क्षणी निर्णायक खेळी केली. अक्षरने 11 बॉलमध्ये नॉट आऊट 21 रन्स केल्या. तर वरुणने 1 धाव केली. तर ऑस्ट्रेलियसाठी नॅथन एलिस आणि एडम झॅम्पा या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. तर झेव्हीयर बार्टलेट आणि मार्कस स्टोयनिस या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.