सौर क्षेत्रातील कंपनीचा IPO 11 नोव्हेंबरला उघडणार, ग्रे मार्केटमध्ये शेअर्स तेजीत, जाणून घ्या GMP
ET Marathi November 06, 2025 08:45 PM
मुंबई : देशातील आघाडीची सोलर मॉड्यूल उत्पादक कंपनी एमवी फोटोव्होल्टेइक पॉवरचा आयपीओ ११ नोव्हेंबर रोजी गुंतवणूकीसाठी उघडणार आहे. कंपनीने २०६ रुपये ते २१७ रुपये किंमत पट्टा निश्चित केला आहे. गुंतवणूकदारांना १३ नोव्हेंबरपर्यंत आयपीओसाठी बोली लावता येईल. MV Photovoltaic Power ipo चा आकार २,९०० कोटी रुपये आहे. कंपनी आयपीओद्वारे ९.८८ कोटी शेअर्स आणि ऑफर फाॅर सेलद्वारे ३.४८ कोटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे.



MV Photovoltaic Power ipo साठी ६९ शेअर्सचा लॉट तयार केला आहे. याचा अर्थ किरकोळ गुंतवणूकदारांना १४,९७३ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. शेअर्सचे वाटप १४ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. तर बीएसई आणि एनएसईवर लिस्टिंग १८ नोव्हेंबर रोजी होईल.



कंपनीचे प्रवर्तक मंजुनाथ दोंथी आणि त्यांची पत्नी सुधा ७५६.१० कोटी रुपये किमतीचे शेअर्स विकत आहेत. कंपनी नवीन शेअर्समधून मिळालेल्या रकमेचा वापर १,६२१ कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी करेल. या रकमेचा वापर कंपनी सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी देखील करते.



एमवी फोटोव्होल्टेइक पॉवरने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ३६९ कोटींचा नफा नोंदवला. एका वर्षापूर्वी कंपनीचा नफा २८.९० कोटी रुपये होता. फक्त एका वर्षात कंपनीचा नफा १३ पट वाढला आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीचा महसूल २,३३५.६० कोटी रुपये होता. महसुलात १४५ टक्के वाढ आहे.



GMP वाढ



इन्व्हेस्टर्स गेनच्या अहवालानुसार, कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये २० रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत होता. हे ९.२२% च्या लिस्टिंग गेन दर्शवते. जेएम फायनान्शियल लिमिटेडला बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. केफिन टेक्नॉलॉजीजला आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून नियुक्त केले आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.