साल २०२६ चे पहिले ग्रहण कधी ? नव्या वर्षांत किती ग्रहणे आहेत, सर्व माहिती जाणून घ्या
Tv9 Marathi November 06, 2025 08:45 PM

नवीन वर्ष येण्यासाठी अजून अवकाश आहे. अजून नवीन वर्षे सुरु होण्यास दोन महिने शिल्लक आहेत. परंतू साल २०२६ च्या जानेवारी महिन्यात ग्रहण लागणार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतू त्यात तथ्य नाही. परंतू या वर्षात केव्हा केव्हा ग्रहण लागणार आहे, ही माहिती जाणून घेऊयात….

खगोल अभ्यासक आणि ज्योतिषशास्राच्या मान्यतेनुसार २०२६ चे पहिले ग्रहण १७ फेब्रुवारी रोजी लागणार आहे. हे सुर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण (Annular Solar Eclipse) असणार आहे. या ग्रहणात सुर्याच्या सभोवताली अग्नि वृत्त सारखी रिंग दिसणार आहे. हे सुर्यग्रहण भारतातून आंशिक रुपात दिसणार आहे.

३ मार्च २०२६ रोजू पूर्ण चंद्रग्रहण ( खग्रास ) (Lunar Eclipse) लागणार आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण रात्री भारतासह आशियातील अनेक भागातून पाहाता येऊ शकते. यात सूतककाळ पाळण्याचा ज्योतिषशास्राचे म्हणणे आहे.

१२ ऑगस्ट २०२६ रोजी सूर्यग्रहण (Solar Eclipse)लागणार आहे. हे ग्रहण हरिययाली अमावस्येच्या दिवशी लागणार आहे.हे या वर्षाचे सर्वात चर्चित ग्रहण असणार आहे. अमेरिका आणि युरोपात हे ग्रहण संपूर्णपणे पाहाता येणार आहे. भारतातून मात्र हे सुर्यग्रहण आंशिक रुपाने दिसणार आहे.

२८ ऑगस्ट २०२६ रोजी आंशिक चंद्रग्रहण (Partial Lunar Eclipse) लागणार आहे. यावेळी चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या सावली खाली येणार आहे. भारतातून हे ग्रहण पाहाता येणार आहे.

जानेवारी २०२६ मध्ये कोणतेही ग्रहण नाही

काही दिवस जानेवारी २०२६ मध्ये ग्रहण लागणार आणि सूतक पाळला जाणार असल्याची चर्चा होत आहे.. परंतू पंचांगानुसार जानेवारीत ग्रहणाची कोणतीही स्थिती नाही. यामुळे घाबरण्याची काहीही गरज नाही. ग्रहण सुर्य-चंद्र – पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहणाची स्थिती तयार होत असते. चंद्र आपल्या नोड्स ( राहू-केतू ) वरुन मार्गक्रमण करत असतो. ही खगोलीय स्थिती जानेवारी २०२६ मध्ये तर तयार होत नाहीए..

ज्योतिषशास्रानुसार काय महत्व ?

ज्योतिषशास्रानुसार पहिले ग्रहण नेहमी वर्षातील घटनाक्रमांचे संकेत देत असते. फेब्रुवारीतील ग्रहण कुंभ राशीच्या सौर प्रभाव आणि सिंह-कुंभ अक्षावर घडणार आहे. ज्यामुळे सत्ता, टेक्नॉलॉजी आणि आर्थिक क्षेत्रात घडामोडी होण्याची शक्यता आहे.तसेच मेष, मिथुन, सिंह, वृश्चिक रास आणि कुंभ रास यांना हे ग्रहण अशुभ असल्याने त्यांना भगवान शंकराची पूजा करावी लागणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.