AUS vs UAE Hong Kong International Sixes : हॉन्ग कॉन्ग सिक्सेस टूर्नामेंटमध्ये ऑस्ट्रेलियाने विजयाने सुरुवात केली आहे. संयुक्त अरब अमिराती विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने फक्त 18 चेंडूत 6 विकेटने सामना जिंकला. पूल बी मध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीवीवर जॅक वुडने तुफान बॅटिंग केली. त्याने केवळ 11 चेंडूत 55 धावा ठोकल्या. पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम पहिल्या स्थानावर आहे. पूलमध्ये तिसरी टीम इंग्लंडची आहे.
हॉन्ग कॉन्ग सिक्सेस टूर्नामेंटच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने88 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 3 ओव्हरमध्ये विकेट न गमावता विजय मिळवला. लेफ्टी फलंदाज जॅक वुडने केवळ 11 चेंडूत 7 सिक्स आणि 3 फोर मारुन 55 धावांची इनिंग खेळला. या दरम्यान त्याने 500 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. निक हॉब्सने 5 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 26 धावा केल्या. पहिल्या सामन्यात UAE ला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
शानदार प्रदर्शनासाठी प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार
UAE च्या टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 6 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 87 धावा केल्या. सगीर खानने 6 चेंडूत 4 षटकारांसह 24 धावा केल्या. मुहम्मद अरफानने 14 चेंडूत 3 चौकार आणि दोन सिक्ससह नाबाद 28 धावा केल्या. कॅप्टन खालिद शाहने 5 चेंडूत 1 चौकार आणि एका षटकारासह 11 धावा केल्या. जाहिद अलीने 5 चेंडूत 1 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 17 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून क्रिस ग्रीनने एका ओव्हरमध्ये 19 धावा देऊन दोन विकेट घेतले. जॅक वूडने 2 ओव्हरमध्ये 13 रन्स देऊन एक विकेट काढला. जॅक वूडला शानदार प्रदर्शनासाठी प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.
सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवलेलं
29 वर्षाच्या जॅक वूडने बिग बॅश लीगमध्ये 2020 साली ब्रिसबेन हीटकडून डेब्यू केलेला. या लीगमध्ये तो 6 सामने खेळला. त्याने 19.50 च्या सरासरीने 117 धावा केल्या. या दरम्यान त्याने 2 विकेट काढले. जॅक वूड मागच्यावर्षी हॉन्ग कॉन्ग सिक्सेस टुर्नामेंटचा भाग होता. या टुर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवलेलं.