China Missile Programme : चीनचा खळबळजनक मिसाइल प्लान उघड, भारत-अमेरिकेला सर्वाधिक धोका, सॅटलाइट इमेजमधून पहिल्यांदाच धक्कादायक सत्य समोर
GH News November 08, 2025 07:11 PM

भारतची सध्या चीन बरोबर जवळीक वाढली आहे. पण, तरीही चीनवर पूर्ण विश्वास ठेवता येणार नाही. कारण चीनचा इतिहास हा दगा फटक्याचा राहिला आहे. आता चीनच्या मिसाइल प्लानबद्दल धक्कादायक माहिती समोर आलीय. चीनने मागच्या पाच वर्षात जवळपास 50 मिसाइल फॅक्टरी सुरु केल्या आहेत. यात दोन कारखाने भारत-चीन सीमेजवळ आहेत. सॅटलाइट इमेजमधून पहिल्यांदाच हा खुलासा झालाय. मिसाइल उत्पादन वाढवण्यासाठी चीनने हे कारखाने सुरु करण्याचा निर्णय घेतला. सर्वाधिक मिसाइल कारखाने राजधानी बीजिंग आणि वुहान जवळ उघडण्यात आले आहेत. अमेरिकी आऊटलेट सीएनएनने डेटा, नकाशा आणि सॅटलाइट इमेजच्या माध्यमातून यावर डिटेल रिपोर्ट बनवलाय.

या रिपोर्टमध्ये म्हटलय की, चीनने अमेरिकेला मागे टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात मिसाइल उत्पादनाचे कारखाने उघडले आहेत. चीनमध्ये अशी 137 ठिकाणं आहेत, जिथे मिसाइल उत्पादन सुरु आहे. वुहानमध्ये चीनने मिसाइल उत्पादनाचे 10 कारखाने उघडले आहेत. बीजिंगमध्ये नऊ फॅक्टरी आहेत. शियान प्रांतामध्ये सुद्धा मिसाइलच्या 9 फॅक्टरीज आहेत. असमच्या जवळ चेंगडू आणि गुजियांगमध्ये प्रत्येकी एक-एक मिसाइल कारखाना आहे. मिसाइल उत्पादनाच्या फॅक्टरीसह चीन रिसर्च आणि टेस्टिंग सेंटर सुद्धा तयार करतोय. चीनकडे मिसाइलची माहिती गोळा करण्यासाठी 30 रिसर्च सेंटर आहेत. यात 12 टेस्टिंग सेंटर आहेत.

चीनकडे किती अणवस्त्र?

चीनने अणवस्त्र वाहून नेऊ शकणाऱ्या मिसाइल उत्पादनासाठी सुद्धा अनेक सेंटर उघडले आहेत. स्टॉकहोम इंटरनॅशनलनुसार, 600 अणवस्त्र आहेत. अमेरिकेनुसार, चीनला रोखलं नाही, तर ते हजारो अणवस्त्र तयार करतील.सीएनएननुसार, चीनकडे एकूण 137 मिसाइल तयार करण्याची ठिकाणं आहेत, ज्याला फॅक्टरीच नाव देण्यात आलय. यातल्या 65 ठिकाणांचा चीनने मागच्या पाच वर्षात विस्तार केलाय.

चीनकडे किती हजार मिसाइल्स?

फेडरेशन ऑफ अमेरिकन सायटिस्टनुसार, चीनकडे 712 मिसाइल लॉन्चर्स आहेत. यात 450 असेल लॉन्चर्स आहेत, ज्याद्वारे अमेरिकेपर्यंत हल्ला करता येऊ शकतो. अमेरिकी डीआरडीओच्याय अंदाजानुसार, चीनकडे जवळपास 2200 मिसाइल आहेत. चीनकडे 600 अणवस्त्र वॉरहेड आहेत. 2012 मध्ये राष्ट्रपती बनल्यानंतर जिनपिंग यांनी पीपुल्स लिबरेशन आर्मीला आधुनिक बनवणार असल्याचं म्हटलं होतं. त्या अंतर्गत पीएलएमध्ये वेगळ्या रॉकेट फोर्सची स्थापना करण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.