आधी ट्युबलेस टायरची चलती होती. आता तर बाजारात एअरलेस टायर आले आहेत. हे टायर पंक्चर संबंधीच्या समस्येवर चालकांना मोठा दिलासा देणारे म्हटले जात आहेत. एअरलेस टायरला चालवण्यासाठी हवेची गरज लागत नाही. यांना असे डिझाईन केले आहे की त्यामुळे कमी देखभालीसह आणि कोणत्याही धोक्यांविना ड्रायव्हींग करणे सोपे जात आहे. आता आपण हे एअरलेस टायरला किती रुपयांना मिळतात हे पाहूयात..तसेच ट्युबलेस टायरहून ते किती महाग आहेत हे पाहूयात…
एअरलेस असे टायर असतात त्यांना हवेची मूळात गरजच लागत नाही.त्यांना फुगवण्याच्या ऐवजी अशा डिझाईनने तयार केले आहे की विना डिफ्लेक्शन वा पंक्चर शिवाय ते गाडीत फिट होतात. याच्या आत हवा असत नाही. त्यामुळे ते फुटत नाहीत की पंक्चर होत नाहीत. या टायरमध्ये रबर स्पोक आणि बेल्टचा वापर केलेला असतो. जो याला कंट्रोल करणे आणि टायरचा आकार देण्यात मदत करतो.
तसेच या एअरलेस टायरची अंतर्गत संरचना बाहेरुनही दिसत असते. त्यामुळे त्यांना एक वेगळाच लुक मिळतो. एअर लेस टायची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात हवेची गरजच लागत नाही. यासाठी टायर पंक्चरची काही भीती रहात नाही. यात देखभालीची गरजच लागत नाही. यात हवेचा दाब वारंवार चेक करायची किंवा दुरुस्तीची गरज लागत नाही. तसेच हा टायर लांबच्या प्रवास वा ऑफ रोड ड्रायव्हींगसाठी देखील सेफ आहेत.
सध्या बाजारात मिळणाऱ्या सर्वात स्वस्त एअरलेस टायरची किंमत 10,000 ते 20,000 दरम्यान सुरु होते. याची किंमत टायरची साईज, क्वालिटी आणि ब्रँडच्या हिशेबाने बदलू शकते. परंतू असे मानले जात आहे की जसजसे मार्केटमध्ये हे उपलब्ध होत जातील तसतसे याची किंमत कमी होऊ शकते.
भारतात ट्युबलेस टायर देखील सर्वसाधारण पर्याय मानले जात आहेत. भारतात ट्युबलेस टायरच्या किंमतीचा विचार करता ही 1500 ते 60,000 हजारापर्यंत आहे. साईज, ब्रँड आणि उपयोग आधारे याची किंमत अवलंबून असते. याचा अर्थ हा आहे की एअरलेस टायर ट्युबलेस टायरच्या तुलनेत अनेक पट महाग असतात.
एअरलेस टायरला सर्वात आधी मिशेलिनने लाँच केले होते. मिशेलिन कंपनीने वाहन निर्मिती कंपनी जनरल मोटर सोबत मिळून हे टायर तयार केले होते. या एअरलेस टायरचा पहिला वापर शेवरले बोल्ट कारमध्ये करण्याता आला होता. त्यानंतर गुडईयर सारख्या मोठ्या कंपनीने या तंत्रज्ञानावर काम सुरु केले आहे.