AUS vs IND : अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा गाबात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
Tv9 Marathi November 08, 2025 11:45 PM

ऑस्ट्रेलियाने पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा भारताच्या या सलामी जोडीने या संधीचा चांगला फायदा घेत स्फोटक सुरुवात केली. शुबमन आणि अभिषेकने ब्रिस्बेनमधील द गाबा मैदानात सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. अभिषेकने या फटकेबाजी दरम्यान 11 वी धाव पूर्ण करताच इतिहास घडवला. अभिषेकने यासह वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली. अभिषेकने नक्की काय विश्वविक्रम केलाय? हे जाणून घेऊयात.

अभिषेकचा वर्ल्ड रेकॉर्ड

नॅथन एलिस याने सामन्यातील चौथ्या ओव्हरमधील टाकलेल्या पहिल्या बॉलवर अभिषेकने 2 धावा घेतल्या. अभिषेकने यासह 11 धावा केल्या. अभिषेक यासह टी 20i क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत वेगवान 1 हजार धावा करणारा पहिलावहिला फलंदाज ठरला. अभिषेकने याबाबत ऑस्ट्रेलियाच्या टीम डेव्हिड याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. टीमने 569 बॉलमध्ये 1 हजार टी 20i रन्स पूर्ण केल्या होत्या. मात्र अभिषेकने डेव्हीडच्या तुलनेत 41 बॉलआधी 1 हजार रन्स पूर्ण केल्या. अभिषेकने 1 हजार टी 20i धावांपर्यंत पोहचण्यासाठी 528 चेंडूंचा सामना केला.

तसेच अभिषेक टीम इंडियासाठी वेगवान 1 हजार धावा पूर्ण करणारा सूर्यकुमार यादव याच्यांनतर पहिला तर एकूण दुसरा फलंदाज ठरला. सूर्याने 573 बॉलमध्ये 1 हजार टी 20i रन्स केल्या होत्या.

टी 20i मध्ये वेगवान 1 हजार धावा करणारे फलंदाज

अभिषेक शर्मा : 528 बॉल
टीम डेव्हीड : 569 बॉल
सूर्यकुमार यादव : 573 बॉल
फिल सॉल्ट : 599 बॉल

हवामानानंतर पावसामुळे खेळ थांबवला

टीम इंडियाच्या सलामी जोडीच्या फटकेबाजीत हवामानंतर पावसाने विघ्न घातलं. भारताच्या डावातील 4.5 ओव्हरनंतर हवामानामुळे खेळ थांबवण्यात आला. भारताने तोवर बिनबाद 52 रन्स केल्या. शुबमनने 29 आणि अभिषेक शर्माने नाबाद 29 धावा केल्यात.

खराब हवामानानंतर काही मिनिटांनी पावसाने एन्ट्री घेतली. गाबातील या मैदानात जोरदार पाऊस बरसतोय. त्यामुळे खेळाला पुन्हा सुरुवात होणार की नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

1 हजारी अभिषेक शर्मा

𝘼𝙗𝙝𝙞𝙨𝙝𝙚𝙠 𝘼𝙨𝙘𝙚𝙣𝙙𝙨 🔝

1️⃣0️⃣0️⃣0️⃣ T20I runs and counting for the swashbuckling Abhishek Sharma. 👏

He also becomes the second-fastest #TeamIndia batter to achieve this feat 🔥#AUSvIND | @IamAbhiSharma4 pic.twitter.com/60OCsf5rJA

— BCCI (@BCCI)

तर टीम इंडियाच्या नावावर मालिका

दरम्यान टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.  त्यात आता या पाचव्या सामन्यात पावसाने विघ्न घातलं आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारत सहज मालिका जिंकेल. मात्र टीम इंडियाने हा क्रिकेट सामना जिंकून मालिका मिळवावी, अशी इच्छा भारतीय क्रिकेट चाहत्यांची आहे. अशात आता वरुणराजा विश्रांती घेत सामना होऊ देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.