वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारी विकेटकीपर-फलंदाज ऋचा घोष हिचं राज्यात भव्य स्वागत करण्यात आलं. शुक्रवारी तिच्या गावी सिलीगुडी येथे आगमन झाल्यावर सन्मान करण्यात आले. त्यानंतर पश्चिम बंगाल सरकार आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) कडून एका विशेष कार्यक्रमात तिचा सन्मान आणि बक्षीस देण्यात आले. (Photo: PTI)
कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 22 वर्षीय ऋचाला डीएसपी पदावर नियुक्त केले. तसेच राज्याचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान बंग भूषण प्रदान केला. ऋचाला एक खास सोन्याची चेन देखील भेट दिली. (Photo: PTI)
सीएबी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी असोसिएशनच्या वतीने रिचाला 34 लाख रुपये बक्षीस दिले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात 34 धावा काढल्याबद्दल ही रक्कम मिळाली. तसेच सोन्याचा मुलामा दिलेला बॅट आणि बॉल देखील देण्यात आला. (Photo: PTI)
ऋचा घोषने वर्ल्डकपच्या 8 डावात 133 च्या स्ट्राईक रेटने 235 धावा केल्या. इतकंच काय तर वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक 12 षटकार मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. (Photo: PTI)