Kareena Kapoor- Aishwarya Rai : ऐश्वर्या रायचा हा सुपरहिट चित्रपट नाकारला, करीना आजही ढाळते अश्रू; कोट्यावधी..
Tv9 Marathi November 09, 2025 04:45 PM

‘दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम’ अशी एक म्हण आहे. ज्याच्या नशिबात जे आहे ते त्यालाच मिळतं, आणि एखादी गोष्ट तुमच्या नशिबात लिहीली नसेल तर तुम्ही कितीही हात-पाय मारले तरी ते तुम्हाला मिळतच नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत एकाहून एक सरस, उत्तम, तगडी कमाई करणारे चित्रपट बनलेत, त्यामुळे कलाकारांचंही नशीब उजळतं, प्रसिद्धी मिळते. उत्तम कमाईही होतेच. पण काही चित्रपट मिळणं हे तुमच्या नशीबात असावं लागतं, तर काही चांगले चित्रपट मिळत असून सुद्धा काही कलाकार ते थेट नाकारतात आणि मग ते दुसऱ्या कोणाला मिलतात, इतिहास घडवतात, हिट ठरतात. तेव्हा तो चित्रटपट नाकारणाऱ्या स्टार्सना हात चोळत बसण्याशिवाय आणि पश्चाताप करण्याशिवाय काही पर्याय उरत नाही.

बॉलिवूडमध्ये अनेक दशकं गाजवणारी, सौंदर्य आणि तितक्याच उत्तम अभिनयाने मोठा पडदा गाजवणारी अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान. 25 वर्षांनंतरही करीनाची जादू आजही कायम असून तिचे लाखो चाहते तिच्या कामाची, चित्रपटाची वाट पहात असतात. तिने एकाहून एक सरस चित्रपटच दिलेत, अभिनयाने लोकांचं मनही जिंकून घेतलं. मात्र असं असलं तरी याच करीना उर्फ ‘बेबो’ने काही चुकीचे निर्णय घेत अनेक उत्तम चित्रपट नाकारलेही आहेत. जे नंतर इतर अभिनेत्रींना मिळाले आणि त्यांनी बॉक्सऑफीसवर धमाल करत तगडी कमाई केली, त्यामुळे अभिनेत्रींचं करिअर नव्या, उच्च शिखरावरही गेलं, त्या निर्णयांचा करीनाला आजही पश्चाताप होत असेल.

नाकारला सुपरहिट चित्रपट

असाचा एक चित्रपट करीनाने नाकारला आणि तो ऐश्वर्या रायला मिळाल, ज्यात तिने उत्तम कामगिरी केली. त्या चित्रपटात एक नव्हे तब्बल 3 सुपरस्टार्स होते, बॉक्स ऑफीसवरही तो प्रचंड हिट ठरला,ऐश्वर्याला त्यामुळे नवी ओळख मिळाली, आजही चाहत्यांच्या मनात त्या चित्रपटाचे स्थान अबाधित आहे.

तीन-तीन सुपरस्टार्स 

करीनाने नाकारलेला हा चित्रपट 1999 सालचा होता, तिच्यांतर तो ऐश्वर्याकडे गेला आणि त्यातून पहिल्यांदाच सलमान-ऐश्वर्याची जोडी मोठ्या पडद्यावर झळकली. या चित्रपटात अजय देवगणचीही प्रमुख भूमिका होती. करीनाने या चित्रपटाला नकार दिला नसता तर तिचा डेब्यू याच हिट चित्रपटातून झाला असता.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची भूमिका असलेला आणि करीनाने नाकारलेल्या चित्रपटाचे नाव ‘हम दिल दे चुके सनम’ आहे. हा चित्रपट 1999 साली प्रदर्शित झाला. त्यात सलमान खानने समीरची भूमिका तर ऐश्वर्या राय बच्चनने नंदिनीची भूमिका केली होती. अजय देवगण हा वनराजच्या भूमिकेत झळकला. मात्र ऐश्वर्याची भूमिका सुरुवातीला करीना कपूर खानला ऑफर करण्यात आली होती. पण तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्याचा तिला आजहीव पश्चाताप होत असेल.

2000 साली केलं डेब्यू

एवढंच नव्हे तर करीना कपूर खानला हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाची ऑफरही मिळाली होती. तिने काही दिवस चित्रपटाचे चित्रीकरणही केले, पण नंतर काही कारणास्तव तिने हा चित्रपट सोडला. शेवटी, 2000 साली आलेल्या “रेफ्यूजी” चित्रपटातून तिने पदार्पण केले, त्यामध्ये अभिषेक बच्चन याचीही प्रमुख भूमिका होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर अपयशी ठरला.

25 वर्षांच्या कारकिर्दीत करीना कपूरने ‘कभी खुशी कभी गम’, ‘गुड न्यूज’, ‘3 इडियट्स’, ‘बजरंगी भाईजान’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘तलाश’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘जब वी मेट’, ’36 चायना टाउन’, ‘बॉडीगार्ड’ यांसारखे अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.