शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात गुंतवणूकदारांची 36 हजार कोटींची कमाई, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
Marathi November 09, 2025 08:25 PM

भारतीय शेअर बाजारात 3 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत तेजी आणि घसरणीचा ट्रेंड पाहायला मिळाला. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये घसरण झाली. बीएसई वर सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांना मोठा फटका बसला. रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस ते भारती एअरटेलच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. मात्र, एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली.

सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य 88000 कोटी रुपयांनी घटलं. सेन्सेक्स चार  दिवसात 722 अंकांनी घसरला. तर निफ्टीमध्ये 229 अंकांची घसरण पाहायला मिळाली. 5 नोव्हेंबरला शेअर बाजाराला सुट्टी होती. सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य 88635 कोटी रुपयांनी घटलं. म्हणजेच या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांचं 88635 कोटी रुपयांचं नुकसान झालं.

सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी भारती एअरटेल, टीसीएस आणि एचयूएल या तीन कंपन्यांचं मोठं नुकसान झालं. भारती एअरटेलचं बाजारमूल्य 30506.26 कोटी रुपयांनी घसरलं ते 11,41,048.30 कोटी रुपयांवर आलं. टाटा कन्सलटन्सीचं बाजारमूल्य 23680 कोटी रुपयांनी घसरुन ते 1082658.42 कोटी रुपयांवर आलं. हिंदूस्तान यूनीलीवरचं बाजारमूल्य 12253 कोटी रुपयांनी घसरलं.

रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य 11164 कोटी रुपयांनी घसरलं. एचडीएफसी बँकेचं बाजारमूल्य 7303.93 कोटी रुपयांनी घसरलं.  इन्फोसिसचं बाजारमूल्य 2139.52 कोटी रुपयांनी कमी झालं. तर, आयसीआयसीआय बँकेचं बाजारमूल्य 1587.78 कोटी रुपयांनी कमी झालं.

भारतातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी एलआयसीचं बाजारमूल्य 18469 कोटी रुपयांनी वाढून 584366.54 कोटी रुपये झाले. दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचं बाजारमूल्य 17492.02 कोटी रुपयांनी वाढून  8,82,400.89 कोटी रुपये झालं. बजाज फायनान्सचं बाजारमूल्य 14965.08 कोटी रुपयांनी वाढून 6,63,721.32 कोटी रुपये झालं.

बाजारमूल्याचा विचार केला असता रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर कायम आहे. अनुक्रमे एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स, इन्फोसिस, एलआयसी आणि हिंदूस्थान यूनीलीवर असा क्रम आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

येथे प्रकाशित : 09 नोव्हेंबर 2025 05:09 PM (IST)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

आणखी पाहा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.