तपास यंत्रणांना मोठे यश, अमेरिका- जॉर्जियातून भारताच्या 2 मोस्ट वॉण्टेड गँगस्टरना आणणार
GH News November 09, 2025 10:11 PM

भारतीय सुरक्षा एजन्सींना मोठे यश मिळाले आहे. देशाला हवे असणाऱ्या दोन मोस्ट वॉण्टेड गँगस्टरना अटक करण्यात आली आहे. हे गँगस्टर परदेशात सक्रीय होते. हरियाणाच्या पोलिसांच्या मदतीने तपास यंत्रणांनी व्यंकटेश गर्ग याला जॉर्जियातून अटक केली आहे. तर भानु राणा याला अमेरिकेतून अटक करण्यात आली आहे.

हरियाणा पोलिसांच्या मदतीने तपास यंत्रणांनी व्यंकटेश गर्ग याला जॉर्जियातून अटक केली आहे. तर भानु राणा यााल अमेरिकेतून अटक केली आहे. गर्ग आणि राणा यांना लवकरच भारतात प्रत्यार्पित केले जाणार आहे. यावेळी भारताचे दोन डझनाहून अधिक मोठे गँगस्टर देशाच्या बाहेर आहेत. परदेशात राहूनही भारतात गँग ऑपरेट करण्यासाठी नव्या लोकांची भरती हे गँगस्टर करत आहेत.

गर्ग आणि राणा यांच्या अटकेनंतर त्यांची कार्यप्रणाली संदर्भात मोठी माहीती मिळाली आहे. पोलिसांनी सांगितले की यांच्या अटकेनंतर उर्वरित गँगस्टरनी त्यांची सक्रीयता कमी केली आहे. हरियाणाच्या नारायणगडचा राहणारा गर्ग सध्या जॉर्जियात रहात आहे. त्याच्या विरोधात भारतात १० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर भारतातील अन्य राज्यातून तरुणांना भरती करत आहे.

बीएसपी नेत्याची हत्या करुन फरार

गुरुग्राम येथील बहुजन समाज पार्टी (बसपा)च्या एका नेत्याच्या हत्या केल्यानंतर गर्ग जॉर्जियात फरार झाला आहे. गर्ग परदेशात राहणाऱ्या गँगस्टर कपिल सांगवान यांच्या संगतीने जबरस्ती खंडणी वसुलीचे रॅकेट चालवत आहे. ऑक्टोबरमध्ये दिल्ली पोलिसांनी सांगवानच्या चार शुटरना अटक केली होती. हे शुटर बिल्डरच्या घरावर आणि फार्महाऊसवर गोळीबार केल्याच्या प्रकरणात सामील होते.

बिश्नोई गटाशी भानु राणा संलग्न

भानु राणा कुख्यात लॉरेंस बिश्नोई गँगशी संलग्न आहे. मूळचा करनाल येथील असलेला राणा अनेक वर्षांपासून गुन्हेगारी जगतात सक्रीय आहे. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. राणाचे गुन्हेगारी नेटवर्क हरियाणा, पंजाब आणि दिल्लीपर्यंत पसरलेले आहे. पंजाबात झालेल्या एका ग्रेनेड हल्ल्याचा तपास करताना त्याचे नाव पुढे आले होते. जूनमध्ये करनाल स्थित स्पेशल टास्क फोर्सने दोन्ही लोकांना अटक केली होती. त्यांच्याकडे हँडग्रेनेड, पिस्तुल आणि दारुगोळा जप्त करण्यात आला होता. ते राणाच्या इशाऱ्यावर काम करत होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.