Bollywood Famous Actor : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे तरुण अभिनेत्रींसोबत प्रेमसंबंध; पत्नीने केली हेरगिरी, गुप्तहेराचा खुलासा
Saam TV November 09, 2025 10:45 PM

डिटेक्टिव तान्या पुरीने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती उघड केली आहे.

अभिनेत्याने स्वतः त्याच्या पत्नीसमोर सर्वकाही कबूल देखील केले.

पत्नीला अभिनेता (पती) फसवत असल्याचे माहिती होती.

डिटेक्टिव तान्या पुरीने अलिकडेच एका मुलाखतीत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल स्पष्टपणे सांगितले. तिने स्पष्ट केले की, अभिनेत्याच्या पत्नीच्या मॅनेजरने पतीच्या कारवायांची चौकशी करण्यासाठी तिच्याशी संपर्क साधला. चौकशीदरम्यान, तान्याला आढळले की, अभिनेता त्याच्या पत्नीला फसवत होता आणि त्याचे अनेक तरुण अभिनेत्रींशी प्रेमसंबंध होते.तान्याने स्पष्ट केले की आजकाल जोडीदाराला फसवणे सामान्य झाले आहे.

सिद्धार्थ कन्ननशी बोलताना तान्यापुरी म्हणाली, "मला वाटते की बॉलिवूडमध्ये बरेच विवाहबाह्य संबंध आहेत. परंतु लोक त्याबद्दल बोलत नाहीत. प्रत्येकजण आपली प्रतिमा सांभाळतो. मी ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहे त्याचे लग्न2000 च्या दशकाच्या सुरुवातीला झाले. अभिनेता पत्नीची उघडपणे फसवणूक करतो आणि अनेक तरुण अभिनेत्रींसोबत संबंध ठेवतो. त्याने २-३ चित्रपट केले आहेत, ज्या दरम्यान त्याच्या प्रेमसंबंधांच्या अफवा समोर आल्या आहेत. पत्नीलाआपला पती फसवत असल्याचे माहिती होती. त्यांच्या मुलांनाही सगळे कळले होते. त्यांना दोन मोठी मुले आहेत जी इंडस्ट्रीत आहेत. मुलांनाही माहित आहे की त्यांचे वडील काय करतात. पण कॅमेऱ्यासमोर ते एक आनंदी जोडपे आहे."

Baahubali: The Epic Collection : बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली'चा धुराळा; ४ दिवसांत बंपर कमाई अन् रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

पुढे तान्या म्हणाली की, "मला त्यांच्या मॅनेजरद्वारे या प्रकरणाची माहिती मिळाली. पत्नीने मॅनेजरला आमच्याशी संपर्क साधण्यासाठी सांगितले. आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला आढळले की अभिनेता अनेक प्रकरणांमध्ये सहभागी होता. तो अभिनेत्रींना भेटवस्तू देत असे आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून फायदे घ्यायचा. हे सर्व जेव्हा त्याच्या पत्नीने त्याला विचारले तेव्हा त्याने कबूल केले. त्याचे वर्तन विचित्र होते. तो अशा ठिकाणी जायचा जिथे त्याचे चित्रपट चित्रित होत नव्हते. त्याच्या विधानांमध्ये विरोधाभास होते. म्हणून त्याच्या पत्नीला संशय आला आणि तिने आम्हाला सांगितले. "

शेवटी तान्या म्हणाली की, "पत्नीने तिच्या पतीच्या कृतींकडे बराच काळ दुर्लक्ष केले कारण तिच्यासाठी शारीरिक संबंधांपेक्षा भावनिक संबंध अधिक महत्त्वाचे होते. मात्र हे प्रकरण जेव्हा मुलांना समजले तेव्हा तिने या बाबतीत ठाम निर्णय घेतला. जवळजवळ २० वर्षांच्या लग्नानंतर तिने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. बायकोने अभिनेत्याला मुलांसाठी बदलण्याचे सांगितले." या सर्व संभाषणात तान्या पुरीने कोणाचेही नाव उघड केले नाही.

गौरव खन्ना की अमाल मलिक कोण उचलणार 'Bigg Boss 19'ची ट्रॉफी? सोशल मीडियावर कुणाच्या नावाची चर्चा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.