धर्मेंद्र आता हेमा मालिनी नाही तर या व्यक्तीसोबत राहतात एकत्र; त्याबद्दल हेमा यांनी म्हटलं, “मला त्याबद्दल दुःख…”
Tv9 Marathi November 11, 2025 08:45 AM

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत बातम्या समोर येत आहे.धर्मेंद्रहे वयाशी संबंधित आजारांशी झुंजत आहेत. त्यांना बऱ्याच काळापासून अनेक आरोग्य समस्या आहेत. त्यांना 31 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. तथापि, आता त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब सध्या रुग्णालयात त्यांच्यासोबत आहे. आताही त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केल्याचं म्हटलं जात आहे.

धर्मेंद्र वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत

धर्मेंद्र हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात प्रसिद्ध आणि हँडसम अभिनेता मानले जायचे. त्यांना ‘ही मॅन’ म्हटलं जायचं. त्यांची फॅनफॉलोईंग इतकी जबरदस्त होती की चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी वेडे व्हायचे. धर्मेंद्र त्यांच्या चित्रपटासाठी जेवढे प्रसिद्ध होते तेवढेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत होते. चर्चा तर तेव्हा जास्त झाली जेव्हा त्यांनी विवाहित असतानाही हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेमकहाणी 

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेमकहाणी सर्वांनाच माहित आहे. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे वैवाहिक जीवन आजही चर्चेचा विषय आहे. धर्मेंद्र यांनी त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर हिला घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले. एवढंच नाही तर त्यांनी हेमा यांच्याशी लग्न करण्यासाठी धर्मांतरही केले. त्यांना ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत. तर पहिल्या पत्नीपासून त्यांना सनी देओल आणि बॉबी देओल अशी दोन मुले आहेत.

धर्मेंद्र आता हेमा मालिनी नाही तर या व्यक्तीसोबत राहत आहेत 

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नामुळे नक्कीच त्यांच्या पहिल्या पत्नीला धक्का बसला होता. त्यांच्यात बरेच वादही होते. पण तरी देखील त्यांचे दोन्ही कुटुंबाचे धर्मेंद्र यांवरील प्रेम मात्र कमी झाले नाही. त्यांनी दोन्ही कुटुंबांना धरून ठेवलं. दरम्यान धर्मेंद्र गेल्या अनेक वर्षांपासून हेमा मालिनी नाही तर पहिल्या पत्नी प्रकाश कौरकडे परत आले आणि राहू लागले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam)


हेमा मालिनी यांचे स्पष्ट मत 

जेव्हा हेमा मालिनी यांना विचारण्यात आले की त्यांना याबद्दल वाईट वाटते का, तेव्हा त्यांनी म्हटले की “मी स्वतःसोबत आनंदी आहे” एका मुलाखतीत जेव्हा हेमा यांना विचारण्यात आले की धर्मेंद्र आता तिच्यासोबत राहत नाहीत तर त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत राहतात याबद्दल त्यांना वाईट वाटते का, तेव्हा हेमा म्हणाल्या, “मला त्याबद्दल वाईट वाटत नाही आणि मला त्याबद्दल दुःखही नाही. मी स्वतःसोबत फार आनंदी आहे. मला दोन मुली आहेत आणि मी त्यांना खूप चांगले वाढवले ​​आहे. अर्थात, धर्मेंद्र आमच्यासोबत राहत नसले तरी देखील ते नेहमीच आमच्या पाठिशी होते. अगदी सर्वत्र.”

“मी त्यांचा खूप आदर करते”

तसेच हेमा पुढे म्हणाल्या की तिला धर्मजींच्या पहिल्या पत्नीबद्दल त्यांना खूप आदर आहे. त्या म्हणाल्या की, “जरी मी प्रकाशबद्दल कधीही बोलले नाही, तरी मी त्यांचा खूप आदर करते. माझ्या मुलीही धर्मजींच्या कुटुंबाचा आदर करतात. जगाला माझ्या आयुष्यातील प्रत्येक बारकावे जाणून घ्यायचे आहेत, परंतु त्यांनी स्वतःचे काम करावे.”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.