एका माणसाने पत्नीच्या हत्येनंतर तिला न्याय मिळवून देण्यासाठी असं काही केलं, जे कदाचित प्रेमात पडलेला पुरुषच करू शकतो. या व्यक्तीने पत्नीच्या हत्येनंतर २६ वर्षे त्या घराचं भाडं भरलं. त्या घरात त्याच्या पत्नीची हत्या झाली होती. त्याने कोट्यवधी रुपये भाडे भरण्यासाठी घालवले. पण त्यामागे नेमकं कारण काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला जाणून घेऊया नेमकं काय कारण?
खरं तर, हे प्रकरण जपानचं आहे. पत्नीची हत्या झाल्यानंतर दु:खात असलेल्या पतीला आरोपीला कसे शोधावे सुचत नव्हते. त्य़ाने पत्नीची हत्या झालेला फ्लॅट भाड्याने घेतला. तो कधीही त्या फ्लॅटमध्ये राहिला नाही. पण त्य़ाने त्या रिकाम्या घराचं २६ वर्षे भाडं भरलं. या भाड्याची रक्कम जवळपास कोटी रुपयांमध्ये झाली होती. त्याला आशा होती की पत्नीची हत्या कोणी केली हे कळेल. तेही तिथेच राहून…
पूर्ण प्रकरण काय आहे?
13 नोव्हेंबर 1999 हा तो दिवस होता. ताकाबाची पत्नी नामिको ताकाबा आपल्या दोन वर्षांच्या मुलासोबत घरी होती. त्याचवेळी कोणीतरी त्यांच्यावर हल्ला केला. नामिकोला क्रूरपण मारले. तिच्यावर अनेक वेळा चाकूने वार केले गेले. पण तिच्या शेजारी असलेल्या लहान मुलगा हल्ला केला नाही. ते बाळ सुखरूप आणि जिवंत सापडले. या बातमीने संपूर्ण परिसर हादरला.
26 वर्षे कोट्यवधींचं भाडं दिलं
पोलिसांनी या केसमध्ये खूप काम केलं, 1 लाख पोलीस कर्मचारी लावले, 5000 लोकांची चौकशी केली, पण कोणताही क्लू मिळाला नाही. हे प्रकरण हळूहळू थंड होत चाललं होतं. पण ताकाबाने ठरवलं की हे प्रकरण तो कधीच संपू देणार नाही. त्याने ते घर तसंच ठेवलं. रक्ताचे डागही पुसले नाहीत. तो आणि त्याचा मुलगा दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले, पण त्या घराचं भाडं सतत भरत राहिले. 26 वर्षांत त्यांनी फक्त भाड्यातच सुमारे 22 मिलियन येन (१.२ कोटी रुपयांपेक्षा जास्त) खर्च केले. तो मीडियााशी बोलत, जेणेकरून लोक हे प्रकरण विसरू नयेत. त्यांनी पुन्हा लग्नही केलं नाही. त्यांच्या आयुष्याचा एकच उद्देश होता हत्याऱ्याला शोधणे.
पत्नीची बेस्ट फ्रेंडच निघाली खरी आरोपी
गेल्या वर्षी पोलिसांनी हे प्रकरण पुन्हा उघडलं. तपासात एक नाव समोर आलं कुमिको यासुफुकू, वय 69 वर्षे. 30 ऑक्टोबरला कुमिकोने स्वतः पोलिसांसमोर शरणागती पत्करली. समजलं की ती ताकाबाची शाळेतील क्लासमेट होती. ती ताकाबावर प्रेम करायची, त्याला चॉकलेट्स आणि पत्र पाठवायची, पण ताकाबाने तिचा प्रस्ताव नाकारला होता. याच रागातून तिने नामिकोची हत्या केली होती. DNA चाचणीने हे सिद्ध झालं की घटनास्थळी सापडलेलं रक्त तिचंच होतं. आता नामिकोला शिक्षा देण्याची तयारी सुरू आहे.