धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, रुग्णालयात पोहोचलेल्या सेलिब्रिटीमध्ये चिंताजनक वातावरण
Tv9 Marathi November 11, 2025 11:45 AM

Dharmendra Hospitalised: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या अत्यंत नाजूक आहे. 89 वर्षीय अभिनेते वयाशी संबंधित आजारांशी झुंज देत आहेत. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आलं असून त्यांचे संपूर्ण कुटुंबही रुग्णालयात उपस्थित आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल कळल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.. एवढंच नाही तर, बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये देखील चिंताग्रस्त वातावरण दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. 1 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. पण आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.

धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे, त्यांची विचारपूस करण्यासाठी अनेक कलाकार रुग्णालयात पोहोचत आहेत. सोमवारी अनेक बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. ज्यामध्ये सलमान खान,शाहरुख खान, गोविंदा, सनी देवोल, बॉबी देवोल धर्मेंद्र यांना भेटून गेले..

I thank everyone for their concern about Dharam ji who is in hospital for observation. He is being continuously monitored and we are all with him.🙏 I request you all to pray for his welfare and speedy recovery. pic.twitter.com/gJhYLL28Wh

— Hema Malini (@dreamgirlhema)

धर्मेंद्र यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. हेमा मालिनी यांनी ट्विट केलं की ‘सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आभार मानते. त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत. सध्या त्यांचे चाहते धर्मेंद्र लवकर बरे व्हावे आणि पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबासह आनंदी राहावे अशी प्रार्थना करत आहेत.’ धर्मेंद्र यांचा एक फोटो पोस्ट करत हेमा मालिनी यांनी ट्विट केलं आहे.

धर्मेद्र यांच्या प्रकृतीबद्दल नको त्या चर्चा होत असताना, अभिनेता सनी देओल यांच्या टीमने मोठं वक्तव्य केलं. ‘धर्मेंद्र यांची प्रकृती आता स्थिर आहे.. पुढील अपडेट्स उपलब्ध झाल्यावर सांगितले जातील. कृपया त्यांच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवू नका. सर्वांना विनंती आहे की, त्यांनी लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करावी. कृपया कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा.’ चाहते देखील धर्मंद्र यांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.