पाकिस्तान क्रिकेट टीमने मायदेशात श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. पाकिस्तानने श्रीलंकेवर रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात 6 धावांनी मात केली आहे. पाकिस्तानने कॅप्टन सलमान आगा याच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेला विजयासाठी 300 धावांचं आव्हान दिलं होतं. श्रीलंकेनेही या धावांचा पाठलाग करताना चांगली झुंज दिली. मात्र श्रीलंकेचे प्रयत्न अपुरे पडले. श्रीलंकेला पाकिस्तानसमोर 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 293 धावाच करता आल्या. पाकिस्तानने अशाप्रकारे हा सामना जिंकला. पाकिस्तानने विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
श्रीलंकेची अखेरपर्यंत झुंज, पाकिस्तान अवघ्या 6 धावांनी विजय