IND vs SA Test : बुमराहच्या निशाण्यावर शमीचा रेकॉर्ड, यॉर्कर किंग खास रेकॉर्डसाठी सज्ज, फक्त 4 विकेट्सची गरज
GH News November 12, 2025 03:14 AM

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता टीम इंडिया मायदेशात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट, वनडे आणि टी 20I मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याची सुरुवात ही कसोटी मालिकेने होणार आहे. या मालिकेत 2 सामने खेळवण्यात येणार आहे. टेम्बा बावुमा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तर युवा शुबमन गिल याच्या खांद्यावर भारतीय संघाची धुरा आहे. मालिकेतील पहिला सामना हा 14 नोव्हेंबरपासून होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे कोलकातमधील ईडन गार्डन्समध्ये करण्यात आलं आहे. टीम इंडियाचा वेगवान आणि अनुभवी फलंदाज जसप्रीत बुमराह याला खास कामगिरी करण्याची संधी आहे.

बुमराहकडे भारताचा अनुभवी आणि वेगवान गोलंदाज याला कसोटी विकेट्सबाबत मागे टाकण्याची संधी आहे. मोहम्मद शमी याला मागे टाकण्यासाठी बुमराहला फक्त नि फक्त 4 विकेट्सची गरज आहे. त्यामुळे बुमराह शमीला पहिल्या कसोटीत मागे टाकेल, असं निश्चित समजलं जात आहे. शमीला या मालिकेसाठी देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीनंतरही संधी देण्यात आली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.